शिवसेना प्रेस- मंडलिकांच्या घरावर मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना प्रेस- मंडलिकांच्या घरावर मोर्चा
शिवसेना प्रेस- मंडलिकांच्या घरावर मोर्चा

शिवसेना प्रेस- मंडलिकांच्या घरावर मोर्चा

sakal_logo
By

शिवसेनेचा सोमवारी
मंडलिकांच्या घरावर मोर्चा
पवार, देवणेंची माहिती; शाहू समाधिस्थळासाठी आज झोळी घेणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः खासदार संजय मंडलिक यांच्या शिवाजी पार्क येथील घरावर शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. सोमवारी (ता. ८) दुपारी बारा वाजता शाहूपुरी जिमखाना येथून हा मोर्चा निघेल. सुमारे दोन हजार शिवसैनिक मोर्चात सहभागी होतील, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, राजर्षी शाहू समाधिस्थळाला मिळणारा निधी रोखल्यामुळे उद्या (ता. ५) बिनखांबी गणेश मंदिरापासून झोळीने शिवसैनिक निधी जमा करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. शिवसैनिकांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे, असेही आवाहन त्यांनी केले.
श्री. पवार आणि देवणे यांनी सांगितले, खासदार सदाशिवराव मंडलिक यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची उमेदवारी देऊन प्रा. सजंय मंडलिक यांची जबाबदारी घेत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर जिल्ह्यातील स्वाभिमानी जनतेने लाखोंच्या मताधिक्याने त्यांना विजयी केले. मात्र ते आता शिंदे गटात गेल्यामुळे त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. यापूर्वी खासदार धैर्यशील माने, आमदार आबिटकरांच्या घरावर मोर्चा निघाला, मात्र मंडलिकांच्या घरावर मोर्चा निघाला नाही, युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे हा मोर्चा लांबला होता.
पत्रकार परिषदेस दक्षिण शहरप्रमुख रविकिरण इंगवले, उत्तर शहरप्रमुख सुनील मोदी, शहर समन्वयक हर्षल सुर्वे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84047 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..