एक राखी जवानांसाठी उपक्रम बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक राखी जवानांसाठी उपक्रम बातमी
एक राखी जवानांसाठी उपक्रम बातमी

एक राखी जवानांसाठी उपक्रम बातमी

sakal_logo
By

श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल
ट्रस्टतर्फे ‘एक राखी जवानांसाठी’

कोल्हापूर, ता. ४ ः श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट दरवर्षी ‘एक राखी जवानांसाठी’ हा उपक्रम राबवतो. या अंतर्गत घराघरांतून राखी संकलित करून ती सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांना पाठवली जाते. संपूर्ण देश आपल्या कार्याबद्दल कृतकृत्य आहे, ही भावना सैनिकांच्या मनात प्रबळ करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. या वर्षीही शहरातून विविध ठिकाणी राख्या संकलित केल्या जाणार असून ९ ऑगस्टला जिल्हा सैनिक कार्यालयाला या राख्या पाठवल्या जाणार आहेत, अशी माहिती किशोर घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ‘कारगिल युद्धाच्या निमित्ताने हा उपक्रम सुरू केला होता. शहराच्या विविध भागांतील केंद्रांवर आपली राखी जमा करावी.’

राखी संकलन केंद्र
प्रबोधन क्लासेस (आझाद चौक), नागराज पेपर स्टॉल (शुक्रवार गेट), कामत झेरॉक्स (शहाजी कॉलेज आणि टेंबे रोड), भिवटे पोहे सेंटर (महाद्वार रोड), भगिनी मंच (शनिवार पेठ), देवयानी नेट कॅफे (ईगल प्राईड, मिरजकर तिरकटी), मैत्रिण मंच (समर्थ ज्वेलर्स, पंचरत्न प्लाझा, गुजरी), श्रीराम सलून (रघुनाथ टिपुगडे, मेनरोड, राजारामपुरी ५ वी गल्ली), जय महाराष्ट्र रसवंतीगृह (कमलाकर किलकिले, रविवार पेठ, लक्ष्मीपुरी), आनंद मिल्क कॉर्नर (किरण पोवार, मिरजकर तिकटी, पाण्याचा हौदाजवळ), म्हाडगुत पोहे सेंटर (वांगीबोळ, महाद्वार रोड), अभिजित न्यूज पेपर्स एजन्सी (श्री लस्सी समोर, रंकाळा स्टँड), सिंधुदुर्ग समाचार कार्यालय (व्हीनस कॉर्नर), काटे मेडिकल, नागेशकर व्यायामशाळा, (मंगळवार पेठ), तुषार साळगावकर (राधानगरी).

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84052 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top