
एफआरपी निवेदन
साखर उताऱ्याचा बेस कमी करावा
‘जयशिवराय’ची शिवाजी माने; पूर्वीप्रमाणे साखर उतारा धरावा
कोल्हापूर, ता. ४ ः केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीत प्रति टन १५० रुपयांची केलेली वाढ स्वागतार्ह असली तरी त्यासाठी गृहीत धरलेल्या साखर उतारा कमी करावा, अशी मागणी जयशिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी केली आहे.
पूर्वी ‘एसएमपी’ असताना १९८०-८१ पासून ते २००४-०५ पर्यंत उतारा हा ८.५० टक्के धरून प्रतिटन वाढ केली जात होती; परंतु २००५-०६ ला प्रथम हा उतारा साडेआठ ऐवजी नऊ टक्के केला व प्रतिटन पन्नास रुपये वाढ केलेली होती. २००८-०९ पर्यंत ती नऊ टक्के रिकव्हरी बेसला ८१ रुपये १८ पैसे होती. या वेळी पर्यंत ‘एसएमपी’चे सूत्र लागू होते. त्यानंतर ‘एसएमपी’ जाऊन एफआरपीचे सूत्र लागू झाले. त्यावेळी रिकवरी बेस नऊवरून साडेनऊ टक्के केला. त्यावेळी प्रतिटन १२९ रुपये ८४ पैसे वाढ केलेली होती. यामध्येही २०१७-१८ पर्यंत वाढ केलेली नव्हती; परंतु सण २०१८-१९ मध्ये परत उतारा साडेनऊ ऐवजी दहा टक्के केला व या ‘एफआरपी’ प्रति टन २७५ रुपये करण्यात आली. यावरून एक लक्षात येते की, सरकारने २००५-०६ पासून आज पर्यंत वेळोवेळी ‘एफआरपी’ दरात वाढ केल्याचे दिसून येते; परंतु आजपर्यंत चार वेळा उतारा वाढवून शेतकऱ्यांच्या खिशातले पैसे काढून घेतल्याचेही दिसून येते. त्यामुळे एफआरपीत केलेली वाढ स्वागतार्ह आहे पण त्याचवेळी उतारा पूर्वीप्रमाणे कमी करावा, अशी मागणी श्री. माने यांनी या निवेदनात केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84066 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..