एफआरपी वाढीमुळे 120 कोटी वाढ मिळणारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एफआरपी वाढीमुळे 120 कोटी वाढ मिळणारा
एफआरपी वाढीमुळे 120 कोटी वाढ मिळणारा

एफआरपी वाढीमुळे 120 कोटी वाढ मिळणारा

sakal_logo
By

वाढीव एफआरपीचे
जिल्ह्याला मिळणार १२० कोटी
---
केवळ ७५ रुपये प्रतिटन वाढ; उत्पादन खर्च वाढल्याने निराशाच

सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : केंद्र सरकारने एफआरपीमध्ये प्रतिटन ७५ रुपयांची वाढ केली. त्यामुळे जिल्ह्यातील १ कोटी ६० लाख ७७ टन ऊस उत्पादन झाले आहे. यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतिटनामागे वाढीव ७५ रुपयानुसार जिल्ह्यात १२० कोटी ५७ लाख ७५ हजार रुपये जादा रक्कम मिळणार आहे. मात्र, प्रतिटनामागे ऊस उत्पादन आणि इतर खर्चाचा बोजा वाढवला तर शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आहे.
जिल्ह्यात २०२२-२३ या गळीत हंगामासाठी १ लाख ७८ हजार ९१ हेक्‍टर क्षेत्रावर ऊस व खोडवा ऊस आहे. जिल्ह्यात २३ सहकारी आणि खासगी कारखाने आहेत. वर्षाला १ कोटी ६० लाख ७७ हजार टनाचे गाळप होते. तर, १ कोटी ९३ लाख ३ हजार क्विंटल साखर निर्मिती होते. जिल्ह्यात सरासरी १३५ दिवस हंगाम सुरू राहिला. तर, राज्यातील सर्वाधिक ११.९९ टक्के साखर उतारा मिळाला आहे. जिल्ह्यात यंदा उसाचे क्षेत्र २ ते ३ हजार हेक्‍टरने वाढले आहे. यातच केंद्र सरकारने प्रतिटन उसाला ३०५ रुपये एफआरपी वाढ दिली मात्र, साखर उताऱ्याचा बेस २५ टक्केने वाढवल्याने शेतकऱ्यांना केवळ ७५ रुपये एफआरपी वाढ मिळणार आहे. या रकमेचा विचार केला तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून १२० कोटी ५७ लाख रुपये अधिकच मिळणार आहेत.
दिवसें-दिवस उसाचा उत्पादन खर्च वाढत आहे. या तुलनेते उसाची एफआरपी वाढली पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. दरम्यान, केंद्र सरकारने एफआरपीत वाढ केली आहे. जी काही रक्कम शेतकऱ्यांना मिळेल, ती आहे तशी मिळाली तरच शेतकऱ्यांकडून स्वागत केले जाईल, अशी परिस्थिती आहे.

केंद्र सरकारने एफआरपी दरात वाढ केली. पण हे करताना बेस कमी करण्याची मखलाशी केली. त्यामुळे केवळ ७५ रुपये प्रतिटन वाढ होईल. यातही जर ऊस तोडणी- ओढणी वाहतूक लावली आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा कमीच एफआरपी मिळेल.
- धनाजी चुडमूंगे, आंदोलन अंकुश संघटना
...

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84077 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top