
आजादी का अमृतमहोत्सव राख्यांमध्येही
40874
40871
40873
40872
आजादी का अमृतमहोत्सव साकारला राख्यांतही
-
स्कॅन करा, कार्टून बघा ः रक्षाबंधनाचा सेटही बाजारात दाखल
नंदिनी नरेवाडी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः आजादी का अमृतमहोत्सवाचा माहौल सर्वच ठिकाणी पाहायला मिळतो. तो आता राख्यांतही असून तिंरगा राखीही बाजारात दाखल झाली आहे. यंदा बहिणी लाडक्या भावाच्या मनगटावर तिरंगा राखी बांधून ‘आजादी का अमृतमहोत्सव'' साजरा करतील. आठ दिवसांवर आलेल्या रक्षाबंधनाच्या सणानिमित्त बाजारपेठ विविध आकर्षक राख्यांनी सजली आहे. ठिकठिकाणी टाकलेल्या स्टॉलवर राख्यांतील असंख्य प्रकार बहिणींच्या मनावर भुरळ घालत आहेत.
लहान मुलांसाठी दरवर्षी राख्यांमधील नानाविध प्रकार येतात. यंदाही ही परंपरा कायम आहे. राखी स्कॅन केल्यानंतर मोबाईलवर कार्टूनच सुरू होईल, अशा राख्यांनी बालचमूंची मने जिंकली आहेत. सिनचॅन, मॅगी अशा रूपात असणाऱ्या राख्यांवर ‘क्युआर’ कोड दिला आहे. हा ‘क्युआर’ कोड स्कॅन करताच कार्टूनचा व्हिडिओ सुरू होतो. त्यासोबतच दरवर्षीप्रमाणे स्पंज, फॅन्सी, पेंडट, स्टोन, जरदोशी, लुंबा, डोरी, कुंदन, अमेरिकन डायमंड, पांढरे मोती, घुंगरू, लाख, राजस्थानी मिरर वर्क, कलर्ड स्टोन, कलर्ड बीडस आणि कपल राख्याही स्टॉलवर उपलब्ध आहेत. बहिणी भावाच्या पसंतीप्रमाणे राखी खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत.
बाजारात राख्यांचा आणखी एक नावीन्यपूर्ण प्रकार म्हणजे फोटो राखी. भाऊ-बहिणींचा एकत्रित फोटो राखीवर छापून त्याला कलाकुसर करून या राखीला आकर्षक रुप दिले आहे. ही राखीही बहिणींच्या पसंतीस उतरत आहे. याशिवाय पर्यावरणपूरक असलेल्या क्रोशा, बीजराखी आणि इकोफ्रेंडली राख्याही खरेदी केल्या जात आहेत. अशाच प्रकारची रेक्झिन राखीही बहिणींचे लक्ष वेधून घेत आहे.
------
रक्षाबंधनासाठी खास सेटच
रक्षाबंधनादिवशीचे बहिणींचे धावपळ वाचविणारा खास सेटच बाजारात दाखल झाला आहे. यात कुंकू, अक्षता, आकर्षक राखी आणि ओवाळण्यासाठी सिव्हर पॉलिशचे कॉईन यांचा समावेश आहे. रक्षाबंधनादिवशी आरतीचे ताट करण्यासाठी होणारी बहिणींची ‘धावपळ’ लक्षात घेता, अशा प्रकारच्या सेटला बहिणींकडून मागणी आहे. सेट दीडशे ते दोनशे रुपयांना बाजारात उपलब्ध आहे.
-------
कोट
दरवर्षीप्रमाणे यंदा राख्यांमध्ये नावीन्यपूर्ण प्रकार उपलब्ध आहेत. खास करून स्कॅनिंगच्या राख्या, तिरंगा राखी आणि रक्षाबंधनाचा राखी सेट यांना बहिणींकडून मागणी आहे. याशिवाय परंपरागत असलेल्या राख्यांनीही मागणी आहे.
- सिद्धी शहा, महावीर राखी सेंटर, बाजारगेट
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84087 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..