डॉ.कामत यांचा विद्यापीठात सत्कार बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ.कामत यांचा विद्यापीठात सत्कार बातमी
डॉ.कामत यांचा विद्यापीठात सत्कार बातमी

डॉ.कामत यांचा विद्यापीठात सत्कार बातमी

sakal_logo
By

४०८८६

समर्पितपणे केलेल्या कामाचे फलित
कुलगुरू डॉ. डी. टी शिर्के; होमी भाभा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कामत यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः डॉ. होमी भाभा समूह विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती हे डॉ. रजनीश कामत यांनी उच्चशिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने केलेल्या कामाचे फलित आहे, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी काढले. डॉ. कामत यांच्या सत्कार समारंभात आज ते बोलत होते.
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. रजनीश कामत यांची काल सायंकाळी डॉ. होमी भाभा राज्य समूह विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाल्याची घोषणा राजभवनातून झाली. या पार्श्वभूमीवर आज सकाळी प्रशासनातर्फे डॉ. कामत यांचा सत्कार केला. समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते. डॉ. शिर्के म्हणाले, ‘‘संस्थेप्रती समर्पित भावनेतून काम करणारी माणसे दुर्मिळ होत आहेत. अशा दुर्मिळ व्यक्तींपैकी डॉ. कामत हे एक आहेत. अध्यापन आणि प्रशासन यांचे योग्य संतुलन सांभाळत त्यांनी विद्यापीठास बहुमोल योगदान दिले आहे. ‘नॅक’चे सर्वोत्कृष्ट मानांकन मिळवून दिलेच; पण अनुभवाचा लाभ संलग्नित महाविद्यालयांबरोबरच राज्यातील व देशातील विविध विद्यापीठे व उच्चशिक्षण संस्थांनाही मिळवून दिलेला आहे. त्यांच्या रुपाने आता डॉ. होमी भाभा विद्यापीठाशीही शिवाजी विद्यापीठाचे नवे ऋणानुबंध व साहचर्य संबंध प्रस्थापित होतील.’’
प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वाणिज्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, गजानन पळसे, डॉ. आलोक जत्राटकर, आशिष घाटे, अनुष्का कदम आणि अभिजित रेडेकर यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोट
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा वारसा माझ्या रक्तातच आहे. बी. एस. भणगे यांच्यापासून आजतागायत मला नऊ कुलगुरूंसमवेत काम करण्याची संधी लाभली. त्या सर्वांनी मला गुणदोषांसह स्वीकारले आणि काम करण्याची संधी दिली. त्यांच्या कार्यपद्धतीचा माझ्यावर प्रभाव आहे. आपल्या क्षमता आणि मर्यादांसह नव्या जबाबदारीला न्याय देण्याचा आणि शिवाजी विद्यापीठाचे नाव उंचावण्याचा निश्चित प्रयत्न राहील.
डॉ. आर. के. कामत, कुलगुरू, डॉ. होमी भाभा विद्यापीठ, मुंबई

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84124 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top