संविधान स्‍तंभ १५ ऑगस्टपर्यंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संविधान स्‍तंभ १५ ऑगस्टपर्यंत
संविधान स्‍तंभ १५ ऑगस्टपर्यंत

संविधान स्‍तंभ १५ ऑगस्टपर्यंत

sakal_logo
By

कोल्हापूर ः जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात येत असलेल्या संविधान स्तंभाचे संकल्पित चित्र.

संविधान स्तंभाचे काम प्रगतीपथावर
जिल्हाधिकारी कार्यालयात १५ ऑगस्टला होणार अनावरण

कोल्हापूर, ता. ४ ः जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान स्तंभाचे काम प्रगतीपथावर असून, देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात १५ ऑगस्टला त्याचे अनावरण होईल. सुमारे पंधरा लाखांचा निधी यासाठी खर्च होत असून, प्राचार्य अजय दळवी यांच्याकडून स्तंभावरील राजमुद्रा बनविण्यात येत आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान स्तंभाची उभारणी करण्याचा निर्णय यापूर्वीच शासनाने घेतला आहे. त्याचे काम प्रत्यक्षात आता सुरू झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून आत डाव्याबाजूला या स्तंभाचे काम सुरू झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम सुरू असून, सुमारे दहा फुट उंचीचा हा स्तंभ असणार आहे. त्यावर अडीच फुटांची राजमुद्रा असणार आहे. चबुतराही असणार आहे. दगडी बांधकाम असून, स्‍तंभावर संविधान मराठी आणि इंग्रजीमध्ये कोरलेले असणार आहे. कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता वैभव जाधव काम पाहत आहेत. निवासी उपजिल्‍हाधिकारी दत्तात्रय कवितके, तहसीलदार अर्चना कापसे यांनीही आज कामाची पाहणी केली. तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हे काम पूर्ण होऊन स्वातंत्र्य दिनानिमित्त त्याचे अनावरण होईल, अशा विश्‍वास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84135 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top