
गणेशोत्सव बैठक
40892
न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करा
राजारामपुरी पोलिसांचे आवाहान; गणेशोत्सवानिमित्त तालीम मंडळांची बैठक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः ध्वनी प्रदुषणाबाबत न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करून गणेशोत्सव उत्साहात साजरा करा असे आवाहान राजारामपुरी पोलिसांनी तालीम मंडळाना केले. खरे मंगल कार्यालय येथे हद्दीतील तालीम मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.
बैठकीत पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी गणेशोत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करा. उत्सवात ध्वनी प्रदुषण होणार नाही याची काळजी घ्या. वाहतुकीस अडथळा होईल असे मंडप उभा करू नका. आगमण मिरवणूक रेंगाळू देऊ नका. पोलिसांच्या सूचनांचे पालन करा. गर्दीच्या नियोजनाठी मंडपात स्वयंसेवकांसह सीसी टीव्ही बसवा. आवश्यक त्या ठिकाणी पोलिसांची मदत घ्या अशा सूचना केल्या. तसेच मंडप, स्पिकर आदी परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार असून येथूनच सर्व परवाने दिले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेने गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांची तातडीने डागडुजी करावी, यासाठी पोलिस प्रशासनानेही पाठपुरावा करावा अशी मागणी केली. त्याचबरोबर न्यायालयाच्या निर्देशाचे आणि पोलिसांच्या सूचनेचे पालन केले जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे, दिपिका जौंजाळ यांच्यासह तालीम मंडळाचे नितीन पाटील, महेश उत्तुरे, निरंजन कदम, अनिल कदम, योगेश हात्तरगे, नामदेव नागटिळे, सुखदेव बुद्धीहाळकर, आसिफ मुल्लाणी आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84137 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..