रस्ते पॅचवर्क कामे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ते पॅचवर्क कामे
रस्ते पॅचवर्क कामे

रस्ते पॅचवर्क कामे

sakal_logo
By

40831

रस्ते पॅचवर्कसाठी
८९ लाखांची निविदा

पुढील आठवड्यात प्रक्रिया होणार पूर्ण

कोल्हापूर, ता. ४ ः गणेशोत्सवापूर्वी रस्‍त्यांचे पॅचवर्क करण्याच्या दृष्टीने आज महापालिकेने चारही विभागीय कार्यालयांसाठी एकत्रित ८९ लाखांची निविदा प्रसिद्ध केली. कमी कालावधीची निविदा असल्याने पुढील आठवड्यात प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून, पावसाने साथ दिली तर तातडीने काम सुरू केले जाणार आहे.
शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. गेल्या आठवड्यात महाविकास आघाडीच्या माजी नगरसेवकांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेतली होती. त्यावेळी शुक्रवारपर्यंत निविदा प्रक्रिया राबवली जाईल, असे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार चारही विभागीय कार्यालयांसाठी पॅचवर्कसाठी एकत्रित निविदा प्रसिद्ध केली. ८९ लाखांची ही निविदा असून, आठवडाभरात त्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे चारही विभागीय कार्यालयांनी खराब रस्त्‍यांच्या काढलेल्या यादीप्रमाणे पॅचवर्क तातडीने सुरू करता येणार आहे. फक्त पावसाने उघडिप दिली तर पॅचवर्कचे काम लवकर सुरू करता येऊ शकते. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी पॅचवर्कचे काम करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84139 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..