जिल्‍हा परिषद-पंचायत समिती आरक्षण निश्‍चित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्‍हा परिषद-पंचायत समिती आरक्षण निश्‍चित
जिल्‍हा परिषद-पंचायत समिती आरक्षण निश्‍चित

जिल्‍हा परिषद-पंचायत समिती आरक्षण निश्‍चित

sakal_logo
By

जिल्हा परिषद, पंचायत समितीचे आरक्षण निश्‍चित
प्रक्रिया रद्दचा निर्णय मंत्रिमंडळाचा; निवडणूक आयोगाचा आदेश न आल्यामुळे प्रक्रिया सुरूच
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जिल्ह्यातील सर्व आरक्षण जिल्हाधिकाऱ्यांनी निश्‍चित केले आहे. बारा तालुक्यातील आरक्षणावर हरकती आणि सुनावणी झाल्यानंतर हा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी आज जाहीर केला आहे. त्यानुसार प्रत्येक तालुकानिहाय आरक्षणही प्रसिद्धी ही झाली आहे.
दरम्यान कालच मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार ही सर्व प्रक्रिया रद्द झाली असून नव्याने प्रभाग रचनेसह आरक्षण होणार आहे. मात्र याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून प्रशासनाला आदेश आज रात्रीपर्यंत उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे जिल्‍हा प्रशासनाने निवडणुकी संदर्भातील सर्वच प्रक्रीया अद्याप सुरू ठेवली आहे.
२७ जून २०२२ ला राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचना प्रसिद्ध केली होती. त्यानुसार निवडणूक विभागांमध्ये सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रयोजनार्थ आरक्षण अधिसुचना निश्‍चित केली आहे. जिल्‍हा प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या एकूण ७६ जागांचे आरक्षण जाहीर केले आहे. यामध्ये बारा तालुक्यातील सर्वांचे आरक्षण निश्‍चित झाले आहे. प्रत्यक्षात मंत्रिमंडळाच्या नव्या निर्णयानुसार ही निवडणूक रद्द होऊन, पुन्हा प्रभार रचना आणि आरक्षण होणार आहे. मात्र जोपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडून कोणतेही आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त होत नाही तोपर्यंत जिल्‍हा प्रशासनाकडून हा निवडणूक कार्यक्रम सुरुच राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84155 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..