
विभागीय शालेय फुटबॉल
40899
विभागीय फुटबॉलमध्ये महाराष्ट्र हायस्कूल विजेता
कोल्हापूर, ता. ४ : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित विभागीय शालेय फुटबॉल १४ वर्षांखालील स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विजेतेपद मिळवले. हा संघ राज्यस्तरीय सुब्रतो मुखर्जी स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. स्पर्धेचे उद्घाटन कोडोली हायस्कूल संस्थचे अध्यक्ष अजिंक्य अशोक पाटील, प्राचार्य मारुती बोरगे, क्रीडा अधिकारी उदय पवार यांच्या उपस्थितीत झाले. सतीश पाटील, आशिष मांडवकर, प्रदीप साळोखे, अमित शिंत्रे, रघू पाटील आदी उपस्थित होते. कोडोली हायस्कूलच्या पटांगणात या स्पर्धा झाल्या. कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरीतील शालेय जिल्हा संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेचे पंच म्हणून गौरव माने, अवधूत गायकवाड, ऋषिकेश दाभोळे यांनी काम पाहिले.
विजयी व उपविजयी संघास शामराव बाबूराव मांडवकर यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी देऊन गौरविले. उत्कृष्ट खेळाडू सम्राट मोरबाळे (महाराष्ट्र हायस्कूल) लढवय्या खेळाडू आदित्य डेंगणूरकर (सातारा सैनिक स्कूल) यांना गौरवले.
स्पर्धेचा निकाल -
* रत्नागिरी जिल्हा - (सेंट थॉमस स्कूल) विजयी विरुद्ध सांगली म. न. पा. (न्यू इंग्लिश स्कूल मिरज) ३-०, रत्नागिरीकडून ओम भोगटे १ गोल, आयुष केळकर १ गोल, सार्थ सुतार १ गोल.
*सातारा जिल्हा- सातारा सैनिक स्कूल विरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हा (सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली) ३-० साताराकडून प्रज्वल कोकणे १ गोल, यथार्थ मिश्रा २ गोल.
* कोल्हापूर जिल्हा - संजीवन पब्लिक स्कूल पन्हाळा विरुद्ध सांगली जिल्हा (महात्मा गांधी विद्यालय, आष्टा) २-० कोल्हापूरकडून आदित्य जुवेकर १ गोल, रुद्र तापकीर १ गोल.
उपांत्य सामने :
कोल्हापूर महाराष्ट्र हायस्कूल, विजयी विरुद्ध रत्नागिरी जिल्हा (सेंट थॉमस स्कूल) ५-०
सातारा जिल्हा (सातारा सैनिक स्कूल) विरुद्ध कोल्हापूर जिल्हा (संजीवन पब्लिक स्कूल)
अंतिम सामना :
महाराष्ट्र हायस्कूल - विजयी विरुद्ध सातारा सैनिक स्कूल (४-०)
कोल्हापूरकडून सम्राट मोरबाळे १ गोल, सर्वेश गवळी १ गोल, ईशांन तिवले २ गोल.
विजयी संघातील खेळाडू : ईशान हिरेमठ, शुभम कांबळे, धनंजय जाधव, श्रेयस निकम, प्रतीक पाटील, ईशान तिवले, हर्षवर्धन पाटील, सुयश सावंत, आदित्य पाटील, सर्वेश गवळी, सम्राट मोरबाळे, श्री. भोसले, सोहम पाटील, पृथ्वीराज साळोखे, आदित्य पाटील. प्रशिक्षक प्रदीप साळोखे, विजय पाटील, संतोष पोवार, शरद मेढे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84157 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..