पुरवठा विभाग आठ जणांचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरवठा विभाग आठ जणांचा
पुरवठा विभाग आठ जणांचा

पुरवठा विभाग आठ जणांचा

sakal_logo
By

पुरवठा विभागात उरले
केवळ आठ कर्मचारी
नव्या आकृतिबंधाचा कामावर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः नवीन आकृतिबंधामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागात केवळ आठ कर्मचारी आहेत. आजपासून संबंधित सर्व अव्वल कारकून आणि लिपिकांच्या बदल्या करण्याचे काम सुरू झाले आहे. परिणामी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाच्या अन्य विभागात पाठविले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा विभागातून रास्त भाव धान्य दुकानांचे कामकाज पाहिले जाते. तेथे तब्बल २७ कर्मचारी होते. मात्र नव्या आकृतिबंधामुळे केवळ सहा अव्वल कारकून आणि दोन लिपिक वगळता इतरांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे आज पुरवठा विभागात आठच कर्मचारी दिसत होते. जिल्ह्यात १६४० तर शहरात १६४ रास्त भाव धान्य दुकानदार आहेत. त्यांना पुरवठा होणाऱ्या धान्याचा हिशेब, जमा खर्च, डाळीसंह इतर धान्यांचे स्वतंत्र नियोजन करावे लागते. त्यामुळे महसूल मधील इतर विभागापेक्षा पुरवठा विभागात अधिक कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता दिसून येते. तरीही नव्या आकृतिबंदामुळे या विभागातील कामकाजावर परिणाम झाला आहे. राज्यातील सर्वच पुरवठा विभागातील कामावर याचा परिणाम लवकरच दिसून येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84158 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top