पाटाकडील तालीम पाद्यपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाटाकडील तालीम पाद्यपूजन
पाटाकडील तालीम पाद्यपूजन

पाटाकडील तालीम पाद्यपूजन

sakal_logo
By

40902
पाटाकडील तालीम
मंडळातर्फे पाद्यपूजन सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः गणेशोत्सव आता तीन आठवड्यांवर आला असून पाटाकडील तालीम मंडळातर्फे आज पाद्यपूजन सोहळा झाला. यानिमित्ताने झालेल्या विविध धार्मिक विधींना तालमीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. दरम्यान, दोन वर्षांनंतर यंदा तालमीने गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अश्किन आजरेकर यंदाच्या मूर्तीचे देणगीदार आहेत.
कोल्हापूरचा गणेशोत्सव आणि पाटाकडील तालीम मंडळ हे एक अतूट समीकरणच आहे. साहजिकच ढोल-ताशांच्या कडकडाटासह आकर्षक विद्युतरोषणाईच्या साक्षीने पाद्यपूजनाचा सोहळा सजला. आमदार जयश्री जाधव, अश्किन आजरेकर, दुर्वास कदम, तालमीचे अध्यक्ष एस. वाय. सरनाईक, उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, हर्षल सुर्वे, संभाजीराव मांगुरे, आनंदराव पाटील आदींसह तालमीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84159 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top