गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

40909
श्रेयस जाधव, गुरू पाटील

‘गांधीनगर’च्या अध्यक्षपदी श्रेयस जाधव
गडहिंग्लज : येथील गांधीनगर यूथ सर्कलच्या सन २०२२-२३ सालासाठी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी श्रेयस जाधव यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी गुरू पाटील, सचिवपदी अदित्य घेवडे व ऋतुराज पाटील, खजिनदारपदी अनुज बोरगावे व सर्वेश तोडकर यांची निवड केली आहे. या वेळी महेश ऊर्फ बंटी कोरी, नितीन देसाई, राजन जाधव, महेश घुगरी, मिलिंद कोरी, सचिन हत्ती, रमेश हत्तरगी, जयंत पाटील, किरण कापसे, प्रतीक कोरी, नीलेश कमते, जितेंद्र पाटील, समीर हत्ती, शिवानंद दड्डी, अभिजित जळके आदी उपस्थित होते. गणेशोत्सवात विविध सामाजिक उफक्रम राबविण्यासह वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचे नियोजन केले. गणेश जयंती, फुटबॉल स्पर्धेबाबतही चर्चा करण्यात आली.
-----------------
गडहिंग्लज हायस्कूलमध्ये मार्गदर्शन
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संत गजानन महाराज हॉस्पिटलतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. डॉ. अरविंद जाधव व डॉ. महेश साळुंखे यांनी आरोग्यविषयक सवयी व आरोग्याची घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक पी. टी. पाटील यांनी स्वागत केले. पर्यवेक्षक एस. डी. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. व्ही. आर. पालेकर यांनी आभार मानले.
------------------
डॉ. खोत यांची बदली रद्दची मागणी
गडहिंग्लज : येथील उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत खोत यांची झालेली बदली रद्द करावी अशी मागणी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य अजित बंदी यांनी केली आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांना याबाबतचे निवेदन पाठविले आहे. डॉ. खोत यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यात रुग्णालयाच्या कारभाराला शिस्त लावली आहे. सामान्य जनतेतून त्यांच्या कारभाराबाबत चांगल्या प्रतिक्रिया आहेत. त्यांचा गडहिंग्लज उपविभागातील रुग्णांना आधार आहे. त्यामुळे डॉ. खोत यांची बदली रद्द करावी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84187 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..