भाजप कार्यकारणीची गडहिंग्लजला बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप कार्यकारणीची गडहिंग्लजला बैठक
भाजप कार्यकारणीची गडहिंग्लजला बैठक

भाजप कार्यकारणीची गडहिंग्लजला बैठक

sakal_logo
By

40980
गडहिंग्लज : तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत भारतमातेच्या प्रतिमापूजन प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी.

भाजप कार्यकारिणीची
गडहिंग्लजला बैठक
गडहिंग्लज, ता. ५ : भाजपच्या गडहिंग्लज तालुका कार्यकारिणीची बैठक उत्साहात झाली. या बैठकीत हर घर तिरंगासह विविध ठराव करण्यात आले. हॉटेल मल्हारच्या सभागृहात ही बैठक झाली.
शहराध्यक्ष राजेंद्र तारळे यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन झाले. तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी शोकप्रस्ताव मांडला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संदीप नाथबुवा यांनी हर घर तिरंगाबाबतचा ठराव मांडला. अर्चना रिंगणे यांनी अनुमोदन दिले. ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा मिळाल्याबद्दल भाजपच्या अभिनंदनाचा ठराव एल. टी. नवलाज यांनी मांडला. संतोष तेली यांनी अनुमोदन दिले. अॅड. हेमंत कोलेकर, अजित जामदार यांनीही ठराव मांडले. त्याला सुभाष चोथे यांनी अनुमोदन दिले.
रमेश रिंगणे, संदीप रोटे, प्रीतम कापसे, अनिल गायकवाड, प्रकाश पाटील, कुमार पाटील, मारुती राक्षे, अनिल खोत, सोनाली घुगरी, अनिता चौगुले, प्रदीप पाटील, सुनील पाटील, संदीप पाटील, बी. एस. पाटील, संजय कुलकर्णी, दिगंबर विटेकरी, सागर गंधवाले, प्रशांत पाटील, भीमा दुंडगे, आशिष साखरे, दत्तात्रय नाईक, संदीप चव्हाण, संजय राऊत, महेश चिनगोंडा, विजय परीट, अशोक पांडव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84269 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..