समरजित घाटगे माध्यमांशी बोलताना... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समरजित घाटगे माध्यमांशी बोलताना...
समरजित घाटगे माध्यमांशी बोलताना...

समरजित घाटगे माध्यमांशी बोलताना...

sakal_logo
By

घेऊ नये
नवाब मलिकांना सोडविण्यासाठी मुश्रीफांचे मुंबईला खेटे

समरजितसिंह घाटगेंचा आरोप - मी जनतेतून मुश्रीफांना पराभूत करून आमदार होणार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ - मी मुंबईला खेटे मारले, पण ते पेट्रोल दर कमी करण्यासाठी, ओबीसींना आरक्षण मिळण्यासाठी. मात्र हसन मुश्रीफांनी माजी मंत्री नवाब मलिकांना सोडविण्यासाठी खेटे मारताना त्यांना लाज वाटली नाही काय ? ज्यांनी हसिना पारकरांना पैसे दिल्याची कबुली न्यायालयात दिली आहे, त्यांच्यासाठी त्यांनी खेटे मारले. मी राज्यपाल नियुक्त नव्हे तर जनतेतून हसन मुश्रीफ यांना पराभूत करून आमदार होणार आहे, असा पुनरुच्चार आज भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी माध्यमांशी बोलताना केला. जिल्‍हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
गेली काही दिवस आमदार हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांचा शाब्दिक वाद सुरू आहे. याबाबत तुम्ही मुंबईला खेटे मारत आहात, असा आरोप केला जात असल्याबद्दल श्री.घाटगे यांना विचारले असता, त्यांनी सांगितले, की होय, मी मुंबईला खेटे मारले आहेत. मात्र ते पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी, ओबीसीचे आरक्षण मिळविण्यासाठी, शेतकऱ्यांना सवलती देण्यासाठी मारले आहेत. त्यांनी कॉन्ट्रॅक्टरचे पैसे काढण्यासाठी त्यांनी खेटे मारले. त्यांच्या दोन नंबरच्या प्लॉटचे पैसे काढण्यासाठी खेटे मारले, ॲडव्हान्स कामे करून कमिशन घेतले आहे, त्यासाठी ते मुंबईला खेटे मारत आहेत. सरसकट विकासकामांना स्थगिती दिलेली नाही.
भाजप लोकशाहीलाला संपवत असल्याचा आरोप होत आहे या प्रश्‍नावर घाटगे म्हणाले,की ज्यांनी आणीबाणी आणली त्यांनी लोकशाही भाजप संपवत असल्याचे आरोप करू नयेत. बेकायदा कामे करण्यातच सरकारची अडीच वर्षे गेली आहेत. त्यामुळे सर्वाधिक खटले दाखल झाले आहेत. यापैकी एकाही खटल्याचा निकाल सरकारकडून लागलेला नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय शेवटच्या चार तासांच्या कॅबिनेट मध्ये घेण्यासाठी ठेवला, अडीच वर्षे काय केले?

कागल मधील अनियमित कॉलनी नियमित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे बैठका झाल्या. त्यानुसार २४ कुरणी वसाहतींबाबत आदेश झाले आहेत. नवनियुक्त पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांना ‘प्रॉपट्री कार्ड’ दिले जाणार आहे. अन्य सात अशाच वसाहती आहेत. त्याच्याबाबतही मुख्यमंत्री-उपमुख्यंत्री यांना भेटून निवेदन दिले आहे. त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून कागदपत्रे मागविली आहेत. तेही काम लवकर पूर्ण होईल, असेही समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84369 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..