
सीपीआरला निधी
ई-अॅम्ब्युलन्ससाठी
सीपीआरला निधी
आमदार सतेज पाटील यांचा पुढाकार
कोल्हापूर, ता. ६ ः सीपीआरमधील रुग्णांना नेण्यासाठी स्ट्रेचर ढकलण्यासाठी अपुरे मनुष्यबळ आहे. ही गैरसोय दूर होण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी आमदार फंडातून इ ॲम्ब्युलन्ससाठी निधी दिला.
बॅटरीवर चालणाऱ्या ई-अॅम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडर, स्ट्रेचर, सलाईन लावण्याची सुविधा आहे. रुग्णासह चालक, डॉक्टर आणि दोन नातेवाईक यात बसू शकतात. ई-अॅम्ब्युलन्स रॅम्पवरून थेट वॉर्डमध्ये नेणे शक्य आहे. सीपीआरमध्ये २५ हून अधिक वॉर्ड आहेत. रोज रुग्ण उपचारासाठी येतात. त्यानुसार सरासरी १००० ते १२०० पर्यंत रुग्णांची तपासणी होते. हॉस्पिटलमध्ये सहाशेहून अधिक रुग्ण आंतररुग्ण विभागात उपचार घेतात. गंभीर रुग्णांना अपघात विभागातून आंतररुग्ण विभागात सध्या स्ट्रेचरने न्यावे लागते. कित्येकदा वॉर्डबॉय नसेल तर नातेवाईकांना खराब स्ट्रेचरवरून रुग्णाला न्यावे लागते. हे सारे टाळण्यासाठी ई अॅम्ब्युलन्ससाठी माजी मंत्री, आमदार सतेज पाटील यांनी पुढाकार घेतला. तत्काळ स्वतःच्या आमदार फंडातून ई-अॅम्ब्युलन्ससाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84401 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..