शिवसेनेचे झोळी घेऊन निधी संकलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेचे झोळी घेऊन  निधी संकलन
शिवसेनेचे झोळी घेऊन निधी संकलन

शिवसेनेचे झोळी घेऊन निधी संकलन

sakal_logo
By

L41073

जिल्हा शिवसेनेतर्फे झोळी आंदोलन
शाहू महाराजांच्या स्मारकाचा निधी रोखल्याचा निषेध; जमा रक्कम जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द

कोल्हापूर, ता. ५ :  राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्मारकाचा निधी रोखल्यामुळे जिल्हा  शिवसेनेतर्फे बिनखांबी गणेश मंदिरापासून झोळी घेऊन  रस्त्यावर नागरिकाकांकडून निधी संकलन करून  राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. महाद्वार  रोडवर फिरून जमा केलेली रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली.  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या  स्मृती शताब्दीचे  कार्यक्रम शासनाच्या पुढाकारानेच झाले; परंतु सत्ताबदल झाल्यानंतर शिंदे सरकारने महाविकास आघाडीने घेतलेले अनेक निर्णय मागे घेतले.  याचा फटका राजर्षी  शाहू महाराजांच्या समाधी स्मारकाच्या कामासही बसला. महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेला १० कोटी ४० लाखांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेल्या स्थगिती आदेशाने रोखला गेला. या निर्णयाच्या निषेधार्थ  बिनखांबी गणेश मंदिराजवळ महाद्वार रोडवर जमलेल्या शिवसैनिकांनी राज्य सरकारच्या  निषेधाच्या घोषणा देत निधी संकलनाला  सुरवात केली.  हातात काळ्या कापडाची प्रतिकात्मक झोळी घेतलेल्या शिवसैनिकांनी महाद्वार रोडवरून  पापाची तिकटी मार्गे  छत्रपती शिवाजी महाराज  चौकापर्यंत मदत मागण्याचे  आंदोलन केले. एकीकडे राजर्षी शाहूंच्या कार्याचे जाहीर भाषणात गोडवे गायचे आणि दुसरीकडे त्यांच्याच स्मारकाच्या कामाचा निधी रोखायचा , हा सरकारचा दुटप्पीपणा असल्याची टीका शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केली आणि झोळी घेऊन जमा झालेली रक्कम शासनाकडे देणार असल्याचे सांगितले. 
दुसऱ्या टप्प्यातील कामांचा निधी शिंदे-फडणवीस सरकारने  रोखल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे समाधीस्थळी होणाऱ्या कामांना तांत्रिक मंजुरी मिळूनही थांबली  आहेत. १  एप्रिलपासून कामे थांबविण्याच्या सूचना आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याचा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी निषेध केला.  आंदोलनात रवी   इंगवले, हर्षल सुर्वे, सुनील मोदी, कमलाकर जगदाळे, सरदार  तिप्पे, स्वरूप मांगले, धनाजी यादव, रवी चौगले, अवधूत साळोखे, विशाल देवकुळे, शौनक भिडे,  स्मिता सावंत, मनजीत माने  यांनी सहभाग घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84402 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..