हुतात्मा स्मारक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हुतात्मा स्मारक
हुतात्मा स्मारक

हुतात्मा स्मारक

sakal_logo
By

स्वराज्य महोत्सवात विविध उपक्रम
प्रतिभानगर हुतात्मा स्मारकस्थळी महापालिकेतर्फे आयोजन

कोल्हापूर, ता. ५ : आझादी का अमृत महोत्सवांतर्गत प्रतिभानगर हुतात्मा स्मारक येथे ९ ते १७ ऑगस्ट हा आठवडा स्वराज्य महोत्सव म्हणून साजरा होणार आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, युवती, शालेय विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. राष्ट्रपुरुष, स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची माहिती देणारी भित्तीपत्रके, छायाचित्रे यांची प्रदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. पर्यावरण, स्वातंत्र्य, महिला व ज्येष्ठ नागरिकांचे कायदे यावर दररोज सायंकाळी ५ वाजता प्रबोधनात्मक व्याख्याने होणार आहेत.
ज्येष्ठ नागरिक संघाच्या सहकार्याने विविध कार्यक्रम होणार आहेत. ९ ऑगस्टला प्रभात फेरी, झेंडावंदन व सायंकाळी ५ वाजता पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड यांचे पर्यावरणपूरक सार्वजनिक उत्सव यावर व्याख्यान होणार आहे. १० ऑगस्टला परिसर स्वच्छता मोहीम व सायंकाळी निसर्गमित्र अनिल चौगुले व पराग केमकर यांचे वन्यजीव व नैसर्गिक साधन संपत्ती जतन, संवर्धन यावर व्याख्यान होणार आहे. ११ ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महिलांचे योगदान यावर शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. भारती पाटील यांचे व्याख्यान आहे.
१२ ऑगस्टला प्रा. मेघा ठोंबरे यांचे महिलांचे कायदे व ज्येष्ठांचे कायदेशीर अधिकार, १३ ऑगस्टला मोबाईलचे दुष्परिणाम, ऑनलाईन फसवणूक व आर्थिक फसवणूक यावर व्याख्यान आहे. १४ ऑगस्टला पर्यावरण संवर्धनाची शपथ, शाळा परिसरात वृक्ष लागवड व डॉ. संदीप पाटील यांचे निरोगी आरोग्य व आनंदी आयुष्य यावर व्याख्यान आहे. १५ ऑगस्टला प्रभात फेरी, झेंडावंदन व सायंकाळी शाहीर दिलीप सावंत यांचा पोवाड्याचा कार्यक्रम आहे. १६ व १७ ऑगस्टला ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने देशभक्तिपर चित्रपट व स्वामी विवेकानंदांवरील चित्रपट दाखविण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84410 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..