बेस वाढीचा शेतकऱ्यांना फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेस वाढीचा शेतकऱ्यांना फटका
बेस वाढीचा शेतकऱ्यांना फटका

बेस वाढीचा शेतकऱ्यांना फटका

sakal_logo
By

शेतकऱ्यांना प्रतिटन ५७३ रुपये तोटा
एफआरपीसह बेस वाढवल्याचा परिणाम; अनेक वर्षापासून अवलंब

कोल्हापूर, ता. ५ : उसाच्या एफआरपीत प्रतिवर्षी वाढ केली जाते किंवा ती वाढ नैसर्गिकच आहे. एकीकडे एसएमपी किंवा एफआरपीच्या दरात वाढ करायची आणि दुसरीकडे साखर उताऱ्याचा बेस वाढवून शेतकऱ्यांच्या खिशातील पैसे वसूल करायचे. अनेक वर्षापासून हेच सुरू आहे. त्यामुळे पूर्वी कॉंग्रेसचे सरकार असो किंवा आता भाजपचे सरकार एफआरपीसह बेस वाढवल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रतिटन उसामागे ५७३ रुपये तोटा झाला आहे.
देशात पूर्वी १९८०-८१ पासून ते २००४-०५ पर्यंत साखरेचा रिकव्हरी बेस हा ८.५० टक्के होता. त्यानुसार प्रतिटन उसाचा दर निश्‍चित केला जात होता. २००५-०६ ला प्रथम रिकव्हरी बेस हा ८.५ ऐवजी ९ टक्के केला. त्याच वर्षी प्रतिटन एफआरपीमध्ये ५० रुपयांची वाढ केली. २००८-०९ पर्यंत ९ टक्के रिकव्हरी बेसला ८१ रुपये १८ पैसे होते. यावेळी एसएमपीचे सूत्र होते.
दरम्यान, २००९-१० ला एसएमपी संपुष्टात आली आणि एफआरपीचे सूत्र लागू केले. या वेळी प्रतिटन १२९० रुपये मिळाले. मात्र या वेळीही रिकव्हरी बेस ९ ऐवजी ९.५ टक्के केला. त्यामुळे प्रतिटन ४८० रुपये वाढ दिल्याचे कौतुक वाटत होते, तर दुसरीकडे ०.५० टक्के रिकव्हरी बेस वाढवल्यामुळे प्रतिटन १२० रुपये सरकारने कपात केले होते. २०१८-१९ मध्ये प्रतिटन एफआरपी २७५ रुपयाने वाढवली. यातही ०.५० टक्के रिकव्हरी बेस वाढवल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रतिटन पन्नास रुपये कमी झाले. यंदाच्या गळीत हंगामात म्हणजेच २०२२-२३ पासून प्रतिटन १५० रुपये वाढ केली आहे. पण, रिकव्हरी बेस दहा टक्केऐवजी १०.२५ टक्के केला आहे. त्यामुळे वाढलेल्या रकमेतून ३७ रुपये ५० पैसे नुकसान झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत कोणत्याही सरकारने उसाचा रिकव्हरी किंवा साखर उताऱ्याचा बेस वाढवला नसता तर आतापर्यंत शेतकऱ्यांना प्रतिटन ८.५० टक्के रिकव्हरीसाठी प्रतिटन ३०५० रुपये दर मिळाला असता. त्यानुसार काल केंद्र सरकारने प्रतिटन ३०५ रुपये दराप्रमाणे एफआरपीमध्ये वाढ केली. ही वाढ विचारात घेता कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतिटन उसाला ३६९७ रुपये व ऊस तोडणी-ओढणी ६०० रुपये वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात सुमारे ३०९७ रुपयेपर्यंत दर मिळणार आहे. वास्तविक हा दर ३६७० रुपयांपर्यंत मिळणे अपेक्षित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84443 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top