
घरफोड्यास जेरबंद
४१११८
गांधीनगरातील अट्टल घरफोड्या जेरबंद
आठ गुन्ह्यांची उकल; सव्वा दोन लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः रेकॉर्डवरील घरफोड्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. किशन उमाशंकर कुंभारभाटे (वय २७, रा. गांधीनगर) असे त्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून आठ गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून २ लाख ३१ हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. अशी माहिती पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांनी दिली.
पोलिसांनी सांगितले, की स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला रेकॉर्डवरील घरफोडी करणारा संशयित किशन कुंभारभाटे याच्याकडे चोरीचे दागिने असून तो शिये गावातील एका निर्सरीजवळ त्याची विक्री करण्यासाठी येणार आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा लावून संशयित किशनला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चार तोळ्याचे सोन्याचे दागिने, साडेतीन तोळ्याचे चांदीचे दागिने, दोन टीव्ही संच आणि एक मोटारसायकल असा २ लाख ३१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. चौकशीत त्याने शिरोली एमआयडीसीतील पाच, गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यातील दोन असे सात घरफोडी आणि हातकणंगले पोलिस ठाण्यातील मोटारसायकलचा असे एकूण आठ गुन्ह्यांची कबुली दिली. त्याला शिरोली एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे गोर्ले यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84450 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..