अतिरिक्‍त शिक्षकांची अन्य शाळांवर नेमणूक करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिरिक्‍त शिक्षकांची अन्य शाळांवर नेमणूक करा
अतिरिक्‍त शिक्षकांची अन्य शाळांवर नेमणूक करा

अतिरिक्‍त शिक्षकांची अन्य शाळांवर नेमणूक करा

sakal_logo
By

41125


अतिरिक्‍त शिक्षकांना अन्यत्र नेमणूक द्या
शहर-जिल्हा नागरी कृती समिती; शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ५ : शहरातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी आणि शिक्षकांची संख्या अधिक आहे. जेथे विद्यार्थी संख्या जास्त आहे तेथे शिक्षक कमी आहेत. त्यामुळे बसून पगार घेणाऱ्या शिक्षकांची अन्य शाळांवर नेमणूक करावी, अशी मागणी शहर व जिल्हा नागरी कृती समितीने प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्याकडे केली.
शहरातील एका शिक्षण संस्‍थेत १ ली ते ७ वीचे वर्ग भरवण्यात येतात. तेथे रेकॉर्डवर ५६ पटसंख्या असली तरी प्रत्यक्षात ११ विद्यार्थी शाळेत असतात. या ठिकाणी खोटी पटसंख्या नोंदवली असण्याची शक्यता आहे. या शाळेत १३ शिक्षक कार्यरत आहेत. प्रत्येक शिक्षकाला किमान ९० हजार ते १ लाख रुपये पगार आहे. म्हणजे एका विद्यार्थ्याला महिन्याला १ लाख रुपये शासन आणि जनतेच्या निधीतून खर्च करत आहे. एका विद्यार्थ्यांवर एवढा खर्च अन्य कोणत्याही देशात होत नसेल तो कोल्‍हापुरात होत आहे. ही हास्यस्‍पद बाब असली तरी ती वस्‍तुस्‍थिती आहे.
जिल्‍ह्यात अशा अनेक शाळा असण्याची शक्यता आहे. तेथे खातरजमा करून ते शिक्षक पुरेशी विद्यार्थी संख्या आहे, जिथे शिक्षकांची गरज आहे, तेथे अतिरिक्‍त शिक्षकांना नेमणूक द्यावी, अशी मागणी शिष्‍टमंडळाने प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली. तसेच शहरातील ज्या शाळेत ११ विद्यार्थी आहेत त्यांना इतर शेजारील शाळेत प्रवेश देवून, तेथील शिक्षकांना अन्य शाळात नेमणूक दयावी, अशी मागणी यावेळी केले. यावर अतिरिक्‍त शिक्षकांना इतर शाळेत समायोजन करण्याचा प्रस्ताव त्वरित पाठवू देण्याची ग्वाही प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली.
शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे चंद्रकांत सूर्यवंशी, शंकराव शेळके, विनोद डुणूंग, सी. एम. गायकवाड, महेश जाधव, कादर मलबारी, महादेव जाधव, रमेश मोरे, अशोक पवार, भाऊ घोडके, गणेश शिंदे उपस्‍थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84473 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..