जिल्‍हा परिषदेचीही निवडणूक प्रक्रिया रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्‍हा परिषदेचीही निवडणूक प्रक्रिया रद्द
जिल्‍हा परिषदेचीही निवडणूक प्रक्रिया रद्द

जिल्‍हा परिषदेचीही निवडणूक प्रक्रिया रद्द

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेचीही
निवडणूक प्रक्रिया रद्द
---
निवडणूक आयोगाचे आदेश; आता प्रतीक्षा नव्या कार्यक्रमाची
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ५ : जिल्हा परिषद व पंचायत समितीची सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश आज निवडणूक आयोगाने जिल्‍हाधिकाऱ्‍यांना दिले. जिल्हा परिषद व पंचायत समितीची नवीन प्रभाग रचना, आरक्षण सोडत व मतदार यादीचे काम जिल्‍हा निवडणूक विभागाकडून सुरू होते. मात्र, हे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निवडणुकीची प्रक्रिया आता नव्याने राबवली जाणार आहे. वर्षाअखेरीसच या निवडणुका होण्याची शक्यता असली तरी पुढील दोन ते तीन दिवसांत याबाबतचे सुधारित आदेश येतील, असेही सांगण्यात येत आहे. निवडणुकीच्या नव्या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
जिल्‍हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची प्रक्रिया मतदारसंघातील आरक्षणापर्यंत पोचली होती. आरक्षण निश्‍चित झाल्याने इच्‍छुकांनी गाठीभेटी, उमेदवारी, प्रचारास सुरुवात केली होती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच वाढीव सदस्यांचा निर्णय रद्द झाला आणि निवडणूक प्रक्रियेला ‘ब्रेक’ लागला. तरीही निवडणूक आयोगाचे काहीच आदेश न मिळाल्याने काल (ता. ४) मतदारसंघ व तेथील आरक्षण निश्‍चितीचा निर्णय जिल्‍हा प्रशासनाने घेतला. मात्र, २४ तासांच्या आतच ही सर्व प्रक्रिया रद्द करणारा आदेश निवडणूक आयोगाकडून आल्याने निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आली.
महाविकास आघाडी सरकारने जिल्हा परिषद मतदारसंघात वाढ केली होती. त्यामुळे सदस्यांची संख्याही वाढविण्यात आली. या वाढीव सदस्य संख्येला काही आधार नसल्याने तो निर्णय रद्द करण्यात आला. आता सदस्य संख्या तीच राहणार असली, तरी नगरपंचायती, महापालिका यामुळे जी गावे शहरी भागात गेली आहेत, त्याठिकाणच्या उर्वरित गावांचा समावेश इतर मतदारसंघात करावा लागेल. त्यामुळे प्रभाग रचनाही काही प्रमाणात बदलणार आहे. ही सर्व प्रक्रिया करण्यासाठी बराच कालावधी लागेल, असे सांगण्यात येते. दोन-तीन दिवसांत नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84485 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..