
जीवनावश्यक वस्तू वरील जीएसटी रद्द करा
41132
जीवनावश्यक वस्तूवरील
जीएसटी तत्काळ रद्द करा
काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
कोल्हापूर, ता. ५ : केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. यातच जीवनावश्यक वस्तुवरील जीएसटी आकारून भाजप सरकार अन्याय करत आहे. त्यामुळे वाढवलेली जीएसटी व घरगुती गॅस दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी अशी मागणी करत अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. माजी मंत्री सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हंटले आहे की, या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात शेती पीकांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणे शेती खरडून गेली आहे, तर कित्येक शेतीमध्ये नदी नाल्यांचा गाळ साचल्याने ती खराब झाली आहे. आधीच दुबार पेरणीने डबघाईस आलेला शेतकरी या अतिवृष्टीमुळे पूर्णत: कोलमडून पडला आहे. अतिवृष्टी पहाणी समितीच्या भेटी दरम्यान शेतकऱ्यांना तत्काळ सरकारी मदत मिळाली पाहिजे. राज्यात केवळ दोन मंत्र्याचे सरकार आहे. शेतकऱ्यांकडे त्यांचे लक्ष नाही.
आमदार आसगावकर म्हणाले, सरकारने शिक्षण आणि जीवनाश्यक वस्तूंवर जीएसटी आकारून जगणे मुश्किल केले आहे. याचा जनता जाब विचारल्याशिवाय रहाणार नाही. यावेळी, प्रल्हाद चव्हाण, सरला पाटील, तौफिक मुल्लाणी, दुर्वास कदम, संजय पवार-वाईकर, प्रकाश नाईकनवरे, संध्या घोटणे, उदय पवार उपस्थित होते.
प्रमुख मागण्या
-ओला दुष्काळ जाहीर करावा
- हेक्टरी ७५ हजार रुपयाची आर्थिक मदत द्या
- या वर्षात पीककर्ज तत्काळ माफ करावे.
- फळ बागायतदारांना भरीव मदत द्यावी.
- खरवडून गेलेल्या, गाळ साचलेल्या
शेतजमीनीच्या दुरुस्तीसाठी ठोस मदत द्यावी
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84496 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..