रंग- शिल्पसौंदर्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंग- शिल्पसौंदर्य
रंग- शिल्पसौंदर्य

रंग- शिल्पसौंदर्य

sakal_logo
By

लोगो- शिल्पसौंदर्य

41146

सेनापती बापट यांचे अर्ध शिल्प
भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सक्रिय असणारे पुढे मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व देताना जनमानसात सेनापती म्हणून गौरवलेले आणि मुंबईच्या झाडूवाल्या कामगारांच्या चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारे पांडुरंग महादेव बापट यांचे मिरजकर तिकटीच्या इगल्स प्राईड इमारतीसमोरील हे अर्ध शिल्प.
शर्टसारखी कॉलर असणारा, अंगावरील कोट आणि त्याच्या आतमध्ये साधा सदरा, डोक्यावर गांधी टोपी आणि अनेक सत्याग्रह आणि चळवळीमध्ये झटलेल्या सेनापती बापट यांच्या उतारवयातील चेहऱ्यावर मध्यम उठावात काम करत मोठ्या मिशा असूनही शिल्पकारांनी अतिशय उचित असे करुण भाव दर्शवले आहेत. चेहऱ्याची ठेवण, डोळ्यांची खोबन, मध्यम उठावाचे नाक, तसेच जबडा यांचा वयाला योग्य पोत योजत कुशलतेने त्वचा आणि केसांमधील फरक शिल्पकारांनी प्रस्तुत केला आहे. स्वातंत्र्यसेनानी अतिशय भावपूर्ण डोळ्यांनी भविष्याकडे पाहत असलेले वाटतात. त्याची खास ओळख असणारा गोल चष्मा शिल्पासोबत नसला तरी त्यांचे व्यक्तीत्व शिल्पकारांनी यशस्वीपणे साकारले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84539 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..