पपा ६ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पपा ६
पपा ६

पपा ६

sakal_logo
By

४११४९

दानोळी : येथे हजारो रुपये खर्च करुन उत्पादन केलेल्या टोमॅटोला कवडीमोल दर मिळत आहे.

टोमॅटो ८ ते १० रूपये किलो
मागणी घटली ; प्रतिकुल हवामानामुळे उत्पादन खर्च वाढला
युवराज पाटील ः सकाळ वृत्तसेवा
दानोळी, ता.६ ः सततचा पाऊस, त्यानंतर ऊन-पाऊस, ढगाळ वातावरण अशा प्रतिकुल हवामानामुळे सर्वच भाजीपाला उत्पादक शेतक-यांना पिकांवरील रोगराई नियंत्रित करणे व पिके टिकविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यातच टोमॅटोचे दर दोन-तीन महिन्याच्या तुलनेत कमी झाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
यावर्षी एप्रिल, मे व जून महिन्यात टोमॅटो उत्पादकांना दराची लॉटरी लागली होती. त्यावेळी महाराष्ट्रासह इतर राज्यातही टोमॅटोची मागणी होती. त्यामुळे दर चढ राहिले. चांगला दर असल्याने त्यानंतरही शेतक-यांनी टोमॅटोची लागवड केली. मात्र जुलै महिन्याच्या संततधार पावसामुळे टोमॅटोच्या झाडांवर परिणाम होत राहिला. त्यानंतर ऊन-पावसाच्या लपंडावामुळे पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यातच परराज्यातील मागणी कमी झाल्याने टोमॅटोचे दर गडगडले आहेत.
प्रतिकुल हवामानामुळे शेतक-यांचे उत्पादन खर्चाचे गणित कोलमडले आहे.


चौकट-
उन्हाळ्यात मागणी जास्त, पावसाळ्यात कमी
उन्हाळ्यात टोमॅटोला राज्यासह परराज्यात जास्त मागणी असते. त्यामुळे दर चांगला मिळतो. तुलनेत पावासाळ्यात ग्राहकांकडूनच मागणी घटते. त्यामुळे दरांची घसरण होते. यावेळी दर फारच घसरल्याने शेतक-यांना नुकसान सोसावे लागत आहे.

कोट
उन्हाळ्यापेक्षा टोमॅटो क्षेत्रात वाढ झाली आहे आणि बाजारात मागणी घटली आहे. तसेच सततच्या पावसाने व ऊन-पावसामुळे करप्यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. औषधे, खते यांचे वाढलेले दर आणि येणारे उत्पन्न याचा विरोधाभास होत आहे.
-शिवाजी पोवार, शेतकरी, दानोळी

----------
पाच महिन्याचे बाजारपेठेतील घाऊक टोमॅटोचे दर (किलोस)
महिना- दर
एप्रिल, मे - ५५ ते ७० रुपये
जून - २५ ते ३० रुपये
जुलै, ऑगष्ट - ८ ते १२ रुपये

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84545 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..