डिकेटीईच्या पाच विद्यार्थ्यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डिकेटीईच्या पाच विद्यार्थ्यांची निवड
डिकेटीईच्या पाच विद्यार्थ्यांची निवड

डिकेटीईच्या पाच विद्यार्थ्यांची निवड

sakal_logo
By

41262

‘डीकेटीई’च्या पाच विद्यार्थ्यांची निवड
इचलकरंजी, ता. ७ ः येथील ‘डीकेटीई’च्या टेक्स्टाईल डिप्लोमामध्ये शिक्षण घेणाऱ्या पाच विद्यार्थ्यांची नामवंत अशा ‘कलरटोन’ कंपनीत उत्तम पॅकेजसहीत निवड झाली आहे. यात प्रथमेश चव्हाण, अक्षय खोत, शुभम धुमाळे, अभिषेक कांबळे व प्रिंन्स लक्ष्मेश्‍वर सिंग या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
म्हैसूर येथे ‘कलरटोन’ ही कंपनी असून, ती तयार कपडे, लहान मुलांचे कपडे, निटेड कपडे तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. यावर्षी कंपनीमार्फत ऑनलाईन आयोजित रिटर्न टेस्ट, पर्सनल इंटरव्ह्यू अशा अनेक फेऱ्यांमधून विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमतेची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता पाहून या विद्यार्थ्यांची उत्तम पॅकेजसह निवड केली. ‘डीकेटीई’मध्ये टेक्स्टाईल ही वेगळी शाखा वैविध्यपूर्ण आहे. त्यामुळे गेली ३६ वर्षे डिप्लोमा टेक्स्टाईल विभागात १०० टक्के प्लेसमेंट होत आहे. त्यामुळे दहावीनंतर टेक्स्टाईलमधील डिप्लोमा हा एक उत्तम करिअरचा मार्ग विद्यार्थ्यांना उपलब्ध झाल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, ट्रेझरर आर. व्ही. केतकर, सचिव डॉ. सपना आवाडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांना संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक प्रा. डॉ. यू. जे. पाटील, प्लेसमेंट ऑफिसर प्रा. एस. बी. अकिवाटे, प्रा. आर. के. वळसंग यांचे मागदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84685 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..