
मोटारीची काच फोडून सहा तोळ्यांचे दागिने लंपास
41299
कोल्हापूर ः याच मोटारीची काच फोडून चोरट्यांनी दागिन्यांवर डल्ला मारला.
मोटारीची काच फोडून
सहा तोळ्यांचे दागिने लंपास
---
भाऊसिंगजी रोडवर भरदिवसाचा प्रकार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः भाऊसिंगजी रोडवर पार्किंग केलेल्या मोटारीची काच फोडून चोरट्याने सहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने व लॅपटॉप चोरून नेला. भरदुपारी गजबजलेल्या रस्त्यावर हा प्रकार घडला. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः विनायक लक्ष्मण गौड मूळचे उंदरवाडी (ता. कागल) येथील आहेत. ते सध्या नोकरीनिमित्त पुण्यात असतात. ते मोटारीतून नातेवाइकांबरोबर कोल्हापुरात आले होते. ते टाउन हॉलसमोर मोटार उभी करून वकिलांच्या कार्यालयात गेले. मोटारीच्या मागे सॅक ठेवली होती. चोरट्याने मागील दरवाजाच्या डाव्या बाजूची काच फोडली आणि सॅकमध्ये ठेवलेला साडेतीन तोळ्यांचा सोन्याचा नेकलेस, दीड तोळ्याचा हार, ११ ग्रॅम वजनाची कर्णफुले आणि लॅपटॉप असा दोन लाख ७४ हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविला. काही वेळानंतर हा प्रकार उघडकीस आला. गौड यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना वर्दी दिली. पोलिस निरीक्षक संतोष जाधव, अंमलदार संजय कोळी यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
सीसीटीव्हीत संशयित कैद...
करवीर पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वार परिसरात प्रकार घडला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात २५ ते ३० वयोगटातील पाच जणांच्या टोळीने हा प्रकार केल्याचा पोलिसांना संशय आहे. दोन पथकांकडून चोरट्याचा शोध सुरू आहे.
-------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84718 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..