तन्वी सावंत निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तन्वी सावंत निधन
तन्वी सावंत निधन

तन्वी सावंत निधन

sakal_logo
By

41311

करिअरच्या टप्प्यावर
तिच्या स्वप्नांचा चुराडा
मोपेड घसरून जखमी तरुणीचा अखेर मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः पदवीच्या शेवटच्या वर्षाचा तिचा ‘त्या’ दिवशी शेवटचा पेपर. त्याच दिवशी आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस. पुण्यात एका नामवंत कॉलेजमध्ये तिला एमबीएला ॲडमिशनही मिळालेले. एमबीए पूर्ण करून स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आणि भविष्य सोनेरी करायचे. अशा आशेतच ती पुण्याला शिकण्यास जाणार होती. इतक्यात घरी जातानाच ‘सायबर’जवळ तिची गाडी घसरली आणि एका क्रेनच्या चाकाखाली ती आली. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले... दवाखान्यात जाण्यासाठी रुग्णवाहिकाही लगेच मिळेना. शेवटी अग्निशमन दलाच्या गाडीतून तिला खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र दोनच दिवसात स्थिती गंभीर बनली आणि तिने या जगाचा निरोप घेतला. तन्वी शेखर सावंत असे या दुर्दैवी तरुणीचे नाव.
आर. के. नगर परिसरात तन्वी, तिचा मोठा भाऊ आणि आई-वडील असे चौकोनी आनंदी कुटुंब. ती बी. कॉमच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. शिक्षणात तर ती निपुण होतीच शिवाय चित्रेही आखीव-रेखीव काढायची. गिटार वाजवायची. बहारदार नृत्य सादर करायची. शनिवारी (ता. ३०) राजाराम महाविद्यालयात तिचा शेवटचा पेपर होता. पुण्याला गेल्यानंतर मैत्रिणींना भेटता येणार नाही. यामुळे तिने मैत्रिणींसोबत पाणीपुरीचा बेत आखला. पाणीपुरी खाल्ली आणि घरी जायला निघाली. सायबर चौकातून पुढे येतानाच गाडी स्लिप झाली आणि तिथेच घात झाला. अपघातानंतर आजूबाजूला लोक जमले. कित्येकांनी रुग्णवाहिकेला संपर्क साधला मात्र त्या ‘गोल्डन हावर’मध्ये रुग्णवाहिका आलीच नाही. अग्निशमन दलाच्या गाडीतून जवळच्या खासगी दवाखान्यात तिला दाखल केले. मात्र दोनच दिवसांत तिने या जगाचा निरोप घेतला. हरहुन्नरी असलेल्या तन्वीच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. करिअरच्या नव्या टप्प्यावर वळण्याआधीच तिच्या सोनेरी स्वप्नाचा चुराडा झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84731 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..