आजरा ः टस्कर बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः टस्कर बातमी
आजरा ः टस्कर बातमी

आजरा ः टस्कर बातमी

sakal_logo
By

41320

हाजगोळी खुर्दमध्ये
टस्कराचा धुमाकूळ
भातासह उसाचे नुकसान ः शेतकरी हवालदिल
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ६ ः हाजगोळी खुर्द येथे टस्कराने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यांने भातासह ऊस पिकाचे नुकसान केले आहे. त्याच्या उपद्रवाने शेतकरी हवालदिल झाला आहे. ऐन खरिपात टस्कराकडून भात व साची होणारी हानी पाहता वनविभागाने त्याला या परिसरातून हुसकावून लावावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
तालुक्यात दोन टस्कराचा वावर असून एक टस्कर वेळवट्टी व देवर्डे परिसरात आहे. दुसरा टस्कर पेद्रेवाडी, हाजगोळी परिसरात ठाण मांडून आहे. काल शुक्रवार (ता. ५) टस्कराने हाजगोळी खुर्द येथे धुमाकूळ घातला. भातासह ऊस पिकाचे नुकसान केले. शामराव जाधव, पांडुरंग जाधव, बंडू जाधव, मारुती जाधव या शेतकऱ्यांचे ऊस व भात पिकाचे नुकसान केले आहे. त्यांनी भाताची नुकतीच रोपलावण केली होती. या लावणीमध्ये लोळण घेत भात पिक तुडवून टाकले आहे. ऊस पिक फस्त केले आहे. या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. एेन खरीपात टस्कर या परिसरात दाखल झाला आहे. त्याला या परिसरातून हुसकावून लावावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84791 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..