सन्मति विद्यालयात जागृती कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सन्मति विद्यालयात जागृती कार्यक्रम
सन्मति विद्यालयात जागृती कार्यक्रम

सन्मति विद्यालयात जागृती कार्यक्रम

sakal_logo
By

सन्मति विद्यालयात जागृती कार्यक्रम
तारदाळ, ता. ७ : हातकणंगले येथील बाहुबली विद्यापीठ संचलित सन्मती विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राबवण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमासाठी जनजागृती मोहीम अंतर्गत कार्यक्रम राबवला. ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे, सरपंच यशवंत वाणी, ग्रामपंचायत सदस्य वैशाली निकम, विनोद कोराणे आदी उपस्थित होते.
ग्रामविकास अधिकारी श्री. कापसे म्हणाले, ‘‘देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक वीरांनी प्राणांची आहुती दिली आहे. त्यांच्या या कार्यामुळेच आज देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्‍सव साजरा करत असून १३ ते १५ ऑगस्टदरम्यान राष्ट्रध्वज घरावर फडकावावा.’’ ध्वजनिधीसाठीची देणगी मुख्याध्यापक एस. एस. पाटील यांनी ग्रामविकास अधिकारी कापसे यांच्याकडे सुपूर्द केली. तारदाळचे सरपंच यशवंत वाणी, मुख्याध्यापक एस. एस. पाटील, पर्यवेक्षक एम. बी. पाटील, एस. बी. पाटील, व्ही. एम. खोत, आर. सी. चौगुले, एम. डी. चौगुले, सौ. जे. सी. पाटील आदी उपस्थित होते. संजय मसूटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जितेंद्र आणुजे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84830 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..