बालाजी पतसंस्थेच्या दोन नविन शाखा लवकरच सुरुः मदन कारंडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालाजी पतसंस्थेच्या दोन नविन शाखा लवकरच सुरुः मदन कारंडे
बालाजी पतसंस्थेच्या दोन नविन शाखा लवकरच सुरुः मदन कारंडे

बालाजी पतसंस्थेच्या दोन नविन शाखा लवकरच सुरुः मदन कारंडे

sakal_logo
By

41340
-----------
बालाजी पतसंस्थेच्या दोन नवीन
शाखा लवकरच सुरू : मदन कारंडे

इचलकरंजी, ता. ७ ः बालाजी पतसंस्थेच्या तारदाळ व संभाजी चौक या दोन नवीन शाखा लवकरच सुरू होणार आहेत. संस्थेच्या वतीने सभासद कर्जदारांचा विमा उतरवण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष मदन कारंडे यांनी दिली. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. महेश क्लब येथे झालेल्या या सभेला रामदास कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. कारंडे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. संस्थेला १ कोटी ७५ लाख इतका नफा झाला आहे. तर गेल्या आर्थिक वर्षाअखेर संस्थेकडे ९९ कोटी १९ लाख इतक्या ठेवी होत्या. ८० कोटी ६८ लाख इतकी कर्जवाटप केले आहे. संस्थेचा राखीव व इतर निधी १४ कोटी १ लाख असून ३९ कोटी ३३ लाख इतकी गूंतवणूक आहे. कर्जदारांनी कारवाई टाळण्यासाठी वेळेत परतफेड करावी.’
प्रभारी जनरल मॅनेजर दिनेश रेंदाळकर यांनी नोटीस वाचन केले. संजय घायतिडक यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन असिस्टंट जनरल मॅनेजर भारत गिड्डे यांनी केले. गणेश माछरे यांनी आभार मानले. उपाध्यक्ष विनायक जोशी, संचालक भगवान कांबुरे, सुनिल पाटील, शिरीष कांबळे, बबिता माछरे, वैशाली कडोलकर, संजय झुंजकर, शिवाजी कारंडे, दत्तात्रय जाधव, सचिन शिंदे, कादर तहसीलदार, सौ. विजयश्री आमटे, संदीप जाधव, कल्लेश्वर वाघमोडे आदी उपस्‍थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84836 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..