अपूर्वा आडगाणेची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपूर्वा आडगाणेची निवड
अपूर्वा आडगाणेची निवड

अपूर्वा आडगाणेची निवड

sakal_logo
By

41343

अपूर्वा आडगाणेची निवड
इचलकरंजी : कोल्हापूर जिल्हा हौशी मैदानी संघटना व महाराष्ट्र राज्य हौशी मैदानी संघटना यांच्या मान्यतेने शिवाजी विद्यापीठ येथे घेतलेल्या मैदानी क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीमध्ये इचलकरंजी हायस्कूलची विद्यार्थिनी अपूर्वा अमोल आडगाणे हिची राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. अपूर्वाने १६ वर्षे वयोगटांमध्ये १०० मीटर धावणे या क्रीडाप्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा २८ ते ३० ऑगस्टला अमरावती येथे होणार आहेत. अपूर्वास अजय पवार, व्ही. एस. गुरुव, डी वाय कांबळे, बी. एम. थोरवत यांचे मार्गदर्शन लाभले.
--------------------
मनसे मराठी कामगार सेना शाखेचे उद्‌घाटन
इचलकरंजी : खंजिरे इंडस्ट्रीज येथे मनसे मराठी कामगार सेना शाखा क्रमांक दोनचे उद्‌घाटन केले. कोल्हापूर उपजिल्हाध्यक्ष रवी गोंदकर, प्रतापराव पाटील, मनसेचे शहर अध्यक्ष, मनसे उपतालुकाध्यक्ष शहाजी भोसले, सहकार सेना जिल्हाध्यक्ष मनोहर जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठी कामगारांच्या समस्या मनसे स्टाईलने सोडवू, असे गोंदकर यांनी सांगितले. महेश शेंडे, योगेश दाभोळकर, जावेद नदाफ, अमित पाल, रोहित जाधव, नितीन कटके, जेम्स तडाके, दिलीप जाधव, संग्राम पोरे, प्रमोद भाटले उपस्थित होते.
--------------
41344
रोटरी क्लब, वेद इंडस्ट्रीजतर्फे वृक्षारोपण
इचलकरंजी : रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व वेद इंडस्ट्रीजतर्फे वृक्षारोपण व रक्तदान शिबिर घेतले. रोटरीचे माजी अध्यक्ष महेश दाते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब व वेद इंडस्ट्रीजतर्फे सामाजिक उपक्रम राबवला. रक्तदान शिबिरामध्ये वेद इंडस्ट्रीमधील ६२ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. रक्तसंकलन आधार ब्लड बँक इचलकरंजीतर्फे केले. रोटरी क्लबचे अध्यक्ष सत्यनारायण धूत, महेश दाते, मुकेश जैन, राजाराम जाधव, चंद्रकांत मगदूम, संदीप तारे, सागर पाटील, प्रकाश रावळ आदी उपस्थित होते. वेद इंडस्ट्रीज, लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84841 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..