अलायन्स हॉस्पिटलमध्ये महाआरोग्य शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अलायन्स हॉस्पिटलमध्ये महाआरोग्य शिबीर
अलायन्स हॉस्पिटलमध्ये महाआरोग्य शिबीर

अलायन्स हॉस्पिटलमध्ये महाआरोग्य शिबीर

sakal_logo
By

अलायन्स हॉस्पिटलमध्ये महाआरोग्य शिबिर
इचलकरंजी, ता. ७ : येथील अलायन्स हॉस्पिटलमध्ये १४ ऑगस्टला सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. शिबिरामध्ये हृदयविकार, मूत्रविकार, कर्करोग विकार, हाडाचे विकार, स्त्रीचे विकार, जनरल शस्त्रक्रिया तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे, यामध्ये प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अमित जोशी, मेडिसीन विभाग डॉ. अभयकुमार कुडचे, डॉ. सॅम्युएल भंडारे, डॉ. सी. पी. पाटील, डॉ. पद्मज बडबडे, कर्करोग विभागाचे डॉ. बसवराज कडलगे, हाडाचे विकार विभागाचे डॉ. प्रिया कुलकर्णी, स्त्री विकार तज्ज्ञ डॉ. अभिजित शिनगारे, जनरल शस्त्रक्रिया विभागाचे डॉ. विलास जोशी, डॉ. सौरभ कुलकर्णी आदी तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करणार आहेत. शिबिरामधील रुग्णांना मोफत ई.सी.जी. रक्तातील साखर तपासणी करण्यात येणार आहे. जनरल शस्त्रक्रियेमधील हर्निया, अपेंडिक्स, मूळव्याध, नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन डिलिव्हरी, गर्भशयाची पिशवी काढणे सवलतीच्या दरात होणार आहे. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्यअंतर्गत पिवळे व केशरी रेशन कार्ड, आधार कार्डधारकांना मोफत अँजिओप्लास्टी, पेसमेकर, दुर्बिणीद्वारे मूतखडा, प्रोस्टेट, स्टिकचर, डायलेसिस, सर्व प्रकारचे कर्करोग ऑपरेशन, हाडाची दुखापत, लिगामेंट शस्त्रक्रिया मोफत होणार आहे. हॉस्पिटलमध्ये येऊन पूर्व नावनोंदणी करणे गरजचे आहे. गरजू नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84842 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..