‘डीकेएएससी’मध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘डीकेएएससी’मध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत
‘डीकेएएससी’मध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत

‘डीकेएएससी’मध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत

sakal_logo
By

41357
कन्या महाविद्यालयास पुस्तके भेट
इचलकरंजी : आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाची विद्यार्थीनी नेहा माळी हिने वाढदिवसानिमित्त स्वयंस्फूर्तीने स्तुत्य उपक्रम राबविला. महाविद्यालयास ग्रंथ भेट देऊन इतर तरूण विद्यार्थीनीसमोर आदर्श ठेवला. वाढदिवसानिमित्त पुस्तके प्राचार्या प्रो. डॉ. त्रिशला कदम यांच्याकडे सुपूर्द केली. वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देऊन नेहा माळी हिचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्राचार्या डॉ. कदम यांनी सांगितले. ग्रंथपाल श्रीमती मिनाज नायकवडी, विद्यार्थी कल्याण मंडळाच्या समन्वयक प्रा. सौ. संगीता पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज शिंदे, प्रा. अनिल कुंभार आदी उपस्थित होते.
---------
41358
‘डीकेएएससी’मध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयात ज्युनिअर विभागाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत व मार्गदर्शन कार्यक्रम झाला. शैक्षणिक जीवनात येणाऱ्या टप्यांची जाणीव करून देत अकरावी व बारावी दोन वर्षे जीवनात महत्वाची असल्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक विकास आडसूळ यांनी सांगितले. माजी विद्यार्थी सुरज कवळीकट्टी यांनी लव ॲण्ड लाईफ या विषयावर मार्गदर्शन केले. लव आणि लाईफचा अनुभव घेताना ध्येय न विसरता होणाऱ्या चुकांकडे लक्ष द्या, असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अनिल पाटील होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. मोहन वीरकर यांनी केले. सुत्रसंचालन व्ही. एस. कुलकर्णी यांनी केले. प्रा. एम. बी. पाटील, प्रा. एम. एम. हांगे, प्रा. सौ. डी. डी. पाटील, प्रा. सी. सी. पाटील, प्रा. सौ. व्ही. एम. पाटील आदी उपस्थित होते.
-----------
41355
शैक्षणिक उद्‌बोधन वर्ग
इचलकरंजी : हातकणंगले तालुका शिक्षण विभागातर्फे तालुकास्तरीय शैक्षणिक उद्‌बोधन वर्ग बळवंतराव यादव हायस्कूल वडगांव येथे झाला. या एक दिवसीय कार्यशाळेत निपुण भारत अभियान अंतर्गत संपर्क अधिकारी विजय भिसे यांनी शैक्षणिक उद्‌बोधन केले. गट शिक्षण अधिकारी प्रविण फाटक, विस्तार अधिकारी जे. टी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. केंद्रप्रमुख बाबासो सिद, बी. जी. पटाईत, संगीता कडूकर, आबाजी कांबळे आदींनी निपुण भारत पार्श्वभूमी, महत्व, ध्येय, पायाभुत साक्षरता, संख्या ज्ञान आदी विषयांवर मार्गदर्शन केले. आभार पूजा कांबळे यांनी मानले. तांत्रिक सहाय्यक स्वाती भोसले यांनी केले. कार्यशाळेस मुख्याध्यापक प्रदीप पाटील यांचे सहकार्य लाभले.
---------
41356
जाधव विद्यामंदीरला साहित्य भेट
इचलकरंजी: लायन्स क्लबच्यावतीने हेल्दी स्कुल उपक्रमांतर्गत जवाहरनगर येथे शंकरराव जाधव प्राथमिक विद्या मंदिरास इलेक्ट्रीक साहित्य दिले. या उपक्रमांतर्गत प्रत्येक वर्गात फॅन व ट्यूब लाईटची सोय केली आहे. लायन्स क्लबच्या या सामाजिक बांधिलकीचे शाळेने कौतुक केले. यासाठी सचिन येलाजा व सौ. वर्षा येलाजा यांचे सहकार्य लाभले. लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र बालर, सुभाष तोष्णीवाल, संदीप सुतार, नंदकुमार बांगड, अमित पोतदार, कृष्णा भराडीया, कांता बालर आदी उपस्थित होते.
----------
वीज कर्मचाऱ्यांतर्फे आंदोलन
इचलकरंजी ः वीज विधेयक २०२२ संसदेत मंजूर करून घेण्याच्या एकतर्फी प्रयत्नाविरूध्द वीज कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात शहरातील वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंते सहभागी होणार आहेत. सोमवारी (ता. ८) कामबंद करून निदर्शने करण्यात येणार आहे. तसेच १० ऑगस्टला सर्व मंडळ कार्यालय आणि मुख्यालयात मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात येणार आहेत. या आंदोलनात शहरातील महावितरण कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना एकटवत सहभागी होणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84859 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..