रेडेकर, जागृती, होरायझनची विजयी सलामी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेडेकर, जागृती, होरायझनची विजयी सलामी
रेडेकर, जागृती, होरायझनची विजयी सलामी

रेडेकर, जागृती, होरायझनची विजयी सलामी

sakal_logo
By

41464
गडहिंग्लज : साधना हायस्कूल विरुद्ध बी. आर. चव्हाण स्कूल यांच्यातील चुरशीचा क्षण. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)


रेडेकर, जागृती, होरायझनची विजयी सलामी
हत्ती, कोले, शण्मुगम फुटबॉल; २४ संघाचा सहभाग, सौरभ मोहिते, साई बनगे चमकले
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ७ : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे रुद्राप्पा हत्ती, आप्पासाहेब कोल, शण्मुगम चषक शालेय फुटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला. चौदा आणि सोळा वर्षे गटात साधना हायस्कूल, गडहिंग्लज हायस्कूल, केदारी रेडेकर पब्लिक स्कूल, न्यू होरायझन संघानी प्रतिस्पर्ध्यावर मात करून विजयी सलामी दिली. सौरभ मोहिते, साई बणगे, सौरभ मक्षी, तनिष्क कांबळे, आयर्न दळवी यांनी प्रत्येकी दोन गोल करून दिवस गाजविला. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर सुरू असणाऱ्या स्पर्धेत २४ संघानी सहभाग घेतला आहे.
आमदार हसन मुश्रीफ यांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेचे उद्‍घाटन केले. युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जून बेल्लद यांनी स्वागत केले. या वेळी युनायटेडचे संचालक सतीश पाटील, अभिजित चव्हाण, गौस मकानदार, गुडूं पाटील, उदय परिट, महेश सलवादे, रश्मीराज देसाई, महेश देवगौंडा, प्रवीण पोवार उपस्थित होते. शुभम आजगेकर यांनी आभार मानले. चौदा वर्षे गटात साधनाने साई इंटरनॅशनल स्कूलला तीन गोलनी हरविले. सौरभ मक्षीने दोन, तर अर्थवरद कदम यांनी गोल केले. रेडेकर स्कूलने जागृती हायस्कूलचा ४-१ असा पराभव केला. रेडेकरच्या तनिष्क कांबळेने दोन, आदित्य माने, सुमित मनगुतकर, रेहान मकानदार यांनी प्रत्येकी एक गोल मारला.
सोळा वर्षे गटातील चुरशीच्या सामन्यात रेडेकर स्कूलने शिवराज स्कूलला ३-१ गोलनी नमविले. रेडेकरच्या सौरभ मोहिते दोन, चिन्मय यादवने एक, तर एक स्वयंगोल झाला. शिवराजच्या श्रीवर्धन म्हेत्रीने केलेला गोल संघाचा पराजय टाळू शकला नाही. जागृती हायस्कुलने क्रिएटिव्ह स्कलचा ४ गोलनी पाडाव केला. जागृतीच्या आर्यन दळवी याने दोन, शुभम राठोड, प्रथमेश पाटील, हृतिक वर्मा यांनी प्रत्येकी एक गोल केला. गडहिंग्लज हायस्कूलने गिजवणेच्या माळ मारुती हायस्कूलचा २-१ असा विजय नोंदविला. गडहिंग्लजच्या सिद्धार्थ कारजगी, विनायक गोंधळी तर गिजवणेच्या सतेज कुरळेने गोल केला.

चौकट..
पुढील वर्षी मोठ्या मैदानावर
स्पर्धेच्या उद्‍घाटनानिमित्त आमदार मुश्रीफ यांनी या वेळी खेळाडूंशी संवाद साधत पुढील स्पर्धा मोठ्या नव्या मैदानावर खेळायच्या असा आशावाद प्रकट केला. जिल्हा परिषदेच्या वडरगे मार्गावरील नियोजित मैदानावर या नवोदितांना अधिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84942 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..