फातरीची भाजी अन्‌ रानभाज्या, श्रावणातील वस्तू आदी वगैरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फातरीची भाजी अन्‌ रानभाज्या, श्रावणातील वस्तू आदी वगैरे
फातरीची भाजी अन्‌ रानभाज्या, श्रावणातील वस्तू आदी वगैरे

फातरीची भाजी अन्‌ रानभाज्या, श्रावणातील वस्तू आदी वगैरे

sakal_logo
By

41531
कोल्हापूर : श्रावण सोमवार असल्यामुळे नैवेद्य असो की, उपवास सोडणे असो. यासाठी खास केळीची पाने हवीच. (सर्व फोटो : अमोल सावंत)


केळी, आळूची पाने घेण्यासाठी गर्दी
श्रावण सोमवार ः श्रावण घेवडा, ऊसावरील शेंगा, फळांना अधिक मागणी

कोल्हापूर, ता. ७ : श्रावणाचं वैशिष्ठ्य असं की, सोमवार आला की अनेकांचे घरोघरी उपवास असतात. उपवास असो की, देवांना नैवेद्य दाखवणं असो यासाठी केळीची पाने या काळात सर्व मंडईत उपलब्ध होतात. पंचक्रोशीतील काही शेतकरी केळीची पाने घेऊन येतात. एक पान पाच ते दहा रुपयांना दिले जाते. केळीच्या पानांबरोबर अळूची पाने, श्रावण घेवडा, ऊसावरील शेंगेची भाजी जेवणात असलीच पाहिजे, हा नियम. तोंडी फळे असलेली खिर, पापडाने चव येते. हे सगळं उपवास असतो म्हणून. लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ मंडईत केळीची पाने घेण्यासाठी गर्दी असते. अळूची पानेही हमखास घेतली जातात.

चौकट
फळभाज्या दर (प्रतिकिलो रुपये)
भेंडी *४०
शेवगा शेंग *१०
बिनीस *६०
काटे काकडी *४०
बेळगावी गाजर *६०
ढब्बू (सिमला मिरची) *६०
काळी वांगी *४०
पांढरी वांगी *६०
कांदा *२०
इंदूरी बटाटा *३०
लिंबू *१० रुपयांना पाच नग
मुळा *१० रुपयांना एक नग
हिरवा वाटाणा *१००
कोबी *४० रुपये नग
फ्लॉवर *२० रुपये नग
दूधी भोपळा *२० रुपये नग
स्वीट कॉर्न *१० रुपये नग
लाल भोपळ्याची फोड *४०
अखंड लाल भोपळा *५०/१०० रुपये नग आकारमानानुसार
लालभडक टोमॅटो *१०/१५
आल्लं *६०
बंदरी गवारी *८०
कारली *४०
दोडका *६०
वरणा *५०
भुईमूग शेंगा *८०
ाश्रावण घेवडा *६०
ऊसावरील शेंग *६०
पडवळ *१०/२० रुपये प्रतिनग
लसूण *५०
पांढरे वाल *८०
घोसावळे *४०
सुरण गड्डा *८०
आळू गड्डा *८०
लाल बीट *१० रुपये प्रतिनग
भाजीसाठी कच्ची केळी *५० रुपये डझन
...
चौकट
पालेभाज्यांचे दर (प्रतिपेंडी) कोथींबीर *३० रुपयांना दोन पेंड्या
मेथी *२०
पालक *१०
शेपू *१०
पोकळा *१०
तांदळी *१०
आंबाडा *१०
चुका *१०
कांदापात *१०
आळूची पाने *१०
केळी पान *पाच ते १० रुपये प्रतिनग
.........
फोटो 41526 (छोटा वापरणे)


सीमला सफरचंदे सर्वत्र!
कोल्हापूर, ता. ७ : एरव्ही अमेरिकन, ऑस्ट्रेलियन, युरोपियन सफरचंदे ही २००/२५० रुपये किलो असतात. इतके महाग सफरचंद कुणी क्वचित घेतं. आता मात्र सीमला सफरचंदांची अखंड बाजारपेठ भरुन गेली आहे. जिकडे जाईल तिकडे सीमफला सफरचंदांच्या ढकल गाड्या दिसतील. गणेश चतुर्थीच्या आसपास ही सफरचंदे मोठ्या प्रमाणात येतात. ऑक्टोबर ते डिसेंबर कालावधीपर्यंत ती बाजारपेठेत राहतात. या सफरचंदांचे वैशिष्ट्य म्हणजे, लहान असली तरी अतिशय गोड असतात. आकारमानानुसार विक्रेते दर सांगतात. डाग असलेली सफरचंदे मात्र कमी दराने देतात. दररोजच्या खाण्याबरोबर खास उपवासासाठी अनेकजण सफरचंदांचा आहार घेतात. आता तर सीमला सफरचंदांमुळे ही संधी कोल्हापूरवासीयांसाठी आलेली आहे.
...
चौकट
फळांचे दर (प्रतिकिलो रुपये)
सीमला सफरचंद *५०/१०० (ग्रेडेशननुसार)
ड्रॅगन फ्रुट *१००
सीताफळ *६०/१००
मोसंबी *५०
डाळींब *६०/८०
किवी फ्रुट *१२०
पपई *२०/५० रुपये प्रतिनग
ैराजा अननस *३०/५० रुपये नग
पिअस (नासपती) *२०० पॅकेटस्‌
देशी पेरु *५०
...
ठळक चौकट
खाद्यतेलाचे दर (प्रतिकिलो/प्रतिलिटर)
सरकी *१६४
शेंगतेल *१९६
सुर्यफुल *२००
सोयाबीन *१५४
लाकडी घाणा शेंगतेल *३१०
लाकडी घाणा करडई *३१०
लाकडी घाणा सनफ्लॉवर तेल *३१०
...
ठळक चौकट
सोने-चांदीचे दर (प्रतिकिलो/प्रतितोळा) (रविवारी सायंकाळी साडेपाच पर्यंत घेतलेले दर)
सोने- ५३,५८० प्रतितोळा
चांदी- ५७,४०० प्रतिकिलो
...
ठळक चौकट
साखर- ३६०० रुपये क्विंटल
साखर- किरकोळ दर : ३८ रुपये किलो
...

ठळक चौकट
धान्य-कडधान्ये दर अपडेटस्‌ (प्रतिकिलो)
हिरवा मूग *१००
जवारी मटकी *१५०
उंची गहू ते बन्सी गहू *३४ ते ४४
तुरडाळ *११५/१२०
हिरवा वाटाणा *८०/९०
काळा वाटाणा *८०
अखंड हरबरा *७०
हरबरा डाळ *७५/८०
उडीद डाळ *१२०
अखंड उडीद *८०
मुग डाळ *१००/११०
मसुर डाळ *१००
अखंड मसूर *९०/१००
बेळगावी मसूर *२८०
पावटा *१६०
हुलगा (सफेद कुळीथ) *८०/९०
पांढरी चवळी *१००
काळा घेवडा *८०
...


फोटो : 40584
कोल्हापूर : श्रावण सुरु झाला की, उपवासाशी संबंधित काही वस्तू घेण्यासाठी शिवाजी मार्केटमध्ये गर्दी असते.

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : श्रावण सुरु झाला की, उपवासांचे वेध सुरु होतात. विशेषत: सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवारी विशेष पुजाही असते. व्रतवैकल्ये आणि सत्यनारायण, मंगळागौरीची पूजांचे आयोजन केले जाते. यासाठी लागणाऱ्या उपवासांचे पदार्थ, पूजाअर्चा, व्रतवैकल्यांचे साहित्यासाठी अधिकाधिक ग्राहक शिवाजी मार्केटमध्ये येतात; कारण इथे लागणारे सर्व प्रकारचे साहित्य मिळते. श्रावणातील उपवास असो, की नित्य उपवास. उपवसातील पदार्थांच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळते.
...


चौकट

देवांच्या मुर्तींना मागणी
देवदेवतांच्या विविध मुर्तींची मोठी बाजारपेठ कोल्हापूर शहरात आहे. या मुर्ती घेण्यासाठी उत्तर कर्नाटकपासून ते खाली तळ कोकणापर्यंत लोक येतात. श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणारे अनेक भाविक अशा मुर्ती घेऊन जातात. आता श्रावणमासारंभ सुरु झाला. यामुळे जुन्या मुर्ती बाजूला काढून नवीन मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी चातुर्मासात मुर्ती आवश्‍यक घेतली जाते. श्री गणेश बाळकृष्ण, विष्णू-लक्ष्मी. शिवपिंडी, अन्नपुर्णा, श्रीदत्त, स्वामी समर्थ, साईबाबा, तुळजाभवानी, श्री जोतीबा आदी मुर्तींना अधिक मागणी असते. जशी देवघरात मुर्ती घेतली जाते, तशाच पद्धतीने लहान-मोठ्या मंदिरातही मुर्ती लागते. जिथेकुठे मंदिरांचे बांधकाम सुरु आहे. मंदिरे पूर्ण झाली आहेत, यासाठी मोठ्या मुर्तींना ही मागणी असते.
...

कोटस्‌

‘‘वर्षभर मुर्तींची विक्री सुरु असते. या मुर्ती प्रामुख्याने चिक्कोडी, अलिगढ (उत्तरप्रदेश) आदी भागातून आम्ही देवदेवतांच्या मुर्ती मागवतो. ज्यांना जी मुर्ती हवी आहे, ती देतो. मुर्तींबरोबर मुर्तींना तसेच देव्हाऱ्यात लागणारे अन्य साहित्यांची ही विक्री सुरु असते. जेव्हा ग्राहक येतात, तेव्हा त्यांना समोर अनेक मुर्ती दिसत असतात. त्यांना जी मुर्ती हवी असते, ती घेतात.’’
-पांडुरंग मेवेकरी, मुर्ती व्यापारी
...


पुजा साहित्याचीही विक्री
उदबत्ती, कापूर, विविध रंगाची अन्‌ गंधांचे अष्टगंध, हळद-कुंकू, कापूर, कापूस वस्त्रे (पवती), महावस्त्रे, निरांजनासाठी वात, देव्हाऱ्यात अन्‌ घरामध्ये विविध ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या वस्तूंना वर्षभर मागणी असते; मात्र श्रावणात अशा वस्तूंना विशेष महत्व येते. या सर्व वस्तू बनविणारे गृहउद्योग ठिकाणी सुरु झाले आहेत; कारण या माध्यमातून महिलांना रोजगार मिळतो. जसे की, तयार पवतं घेऊन विक्री होणाऱ्या पैशातून रोजगार निर्मिती होते. श्री अंबाबाई मंदिर परिसर, कपिलतीर्थ मार्केट, महाद्वार रोड बरोबर शहरातील अनेक किरणा माल्यांच्या दुकानातही अशा वस्तू मिळतात. तसेच मॉल्समध्ये ही खास पुजा साहित्यांच्या दुकानांचे विभाग सुरु केले आहेत. विशेष म्हणजे, पुजा साहित्याबरोबर मॉल्समध्ये देवदेवतांच्या मुर्तीही मिळतात.
...

उपवासाठी लागणो पदार्थ (प्रतिकिलो दर)
वरी (भगर) *१३०
शाबू *७२/७६
शेंगदाणा *१३०/१४०
राजीगरा *१३०
सुके खजूर *१००/३००
पाकिस्तानी खारीक *४००
काळी खारीक *८००
लाल/पांढरी रताळे *४०/५०

...


उपवासाच्या पदार्थांचे दर (प्रतिकिलो रुपये)
बटाटा चिवडा *२८०
चिलीमिली *२४०
शाबू चिवडा *२४०
लाल केळा वेफर्स *३५०
पिवळा केळा वेफर्स *४००
मलई बर्फी *५२०
रसमलई *३६०
रबडी *४००
...

कोटस्‌

‘‘श्रावण सुरु झाला की, आम्ही उपवासाला लागणारे सर्व पदार्थ आवजूर्न ठेवतो. ग्राहकही मोठ्या प्रमाणात येतात. उपवासांच्या पदार्थांत जसे चिवड्यांचे पदार्थांना मागणी असते, तशाच पद्धतीने स्वीटस्‌ लोक घेतात. जशी मागणी असते, त्या पद्धतीने आम्ही पुरवठा करतो.’’
-खेतराम चौधरी, बधाई स्वीटस्‌, शिरोली पुलाची

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84947 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..