किटवडे धनगरवाड्यावर ध्वजाचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किटवडे धनगरवाड्यावर ध्वजाचे वाटप
किटवडे धनगरवाड्यावर ध्वजाचे वाटप

किटवडे धनगरवाड्यावर ध्वजाचे वाटप

sakal_logo
By

41469
किटवडे (ता. आजरा) ः येथील धनगरवाड्यावर तहसीलदार विकास अहिर यांच्या हस्ते धनगर कुटुंबीयांना तिरंगा ध्वजाचे वाटप झाले. या वेळी तलाठी महादेव देसाई, समीर जाधव, कुंभार, शिक्षक उतम कोकितकर आदी.

किटवडे धनगरवाड्यावर ध्वजाचे वाटप
आजरा ः देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त देशभर ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून प्रत्येक घरापर्यंत तिरंगा पुरवण्यासाठी नियोजन आखले जात आहे. आजरा तालुक्यातील सात धनगरवाड्यावरील कुटुंबांना महसूल प्रशासनाने मोफत तिरंगा ध्वज देण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून किटवडे धनगरवाड्यावर तिरंगा ध्वजाचे वाटप तहसीलदार विकास अहिर यांच्या हस्ते करण्यात आले. येथील सर्वच धनगर बांधवाच्या कुटुंबाना तिरंगा ध्वज देण्यात आला. प्रशासनाने ध्वजारोहन प्रसंगी घ्यावयाची आचारसंहितेची माहिती ग्रामस्थांना दिली. या वेळी किटवडेचे तलाठी महादेव देसाई, समीर जाधव, अशोक कुंभार, शिक्षक उतम कोकितकर, पोलिसपाटील विष्णू पाटील, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84966 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..