ई दंड वसुलीसाठी लोक अदालत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ई दंड वसुलीसाठी लोक अदालत
ई दंड वसुलीसाठी लोक अदालत

ई दंड वसुलीसाठी लोक अदालत

sakal_logo
By

ई दंड वसुलीसाठी लोक अदालत
४७ हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई : पावणे दोन कोटी रक्कम थकीत

इचलकरंजी, ता. ७ : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर ई-चलनद्वारे दंडात्मक कारवाई केली जात आहे. तब्बल ४७ हजार ४२६ वाहनधारकांवर अशी कारवाई केली आहे. पण या कारवाईतील दंडाची तब्बल १ कोटी ८३ लाख ७१ हजार इतकी रक्कम वसूल झालेली नाही. दीड वर्षातील ही रक्कम आहे. या रकमेच्या वसुलीसाठी आता लोक अदालतचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्‍यांवर कारवाई केली जाते. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्‍यांवर सीसीटीव्ही, ई-चलनद्वारे ऑनलाईन कारवाई केली जात आहे. नियम मोडल्यानंतर अनेकांना थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर कित्येक वाहनधारक सुसाट निघून जातात. अशा वाहनधारकांवर ई - चलनद्वारे कारवाई केली जाते. अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्‍यांवर गत दीड वर्षात कारवाया केल्या. त्यापैकी १ कोटी ८३ लाख ७१ हजार ७५० रुपये दंड वसूल झालेला नाही.
वाहनधारकांनी दाद न दिल्यामुळे हा दंड वसूल करण्यासाठी आता लोक अदालत उपक्रमाचे आयोजन केले आहे. १३ ऑगस्टला न्यायालयात लोकअदालत होणार आहे. येथे वाहनधारकांना तडजोडीने ई-चलनद्वारे केलेला दंड भरून आपले वाहन दंडात्मक कारवाईतून मुक्त करता येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेकडून वाहनधारकांना नोटिसा पाठवल्या आहेत.
-------------
आता वाढीव दंडाचा फटका
या वर्षात मे महिन्यापासून वाहनधारकांना प्रत्येक कारवाईत दंडाची रक्कम दुप्पट, तिप्पट झाली आहे. त्यामुळे वाहनधारक आता कारवाई झाल्यास रोख पैसे देण्याचे टाळून अनपेडवर भर देत आहेत. मात्र वाढीव दंडामुळे थकीत दंड किमान ७० टक्के वाढला आहे. ऑनलाईन दंडाच्या कारवाईमुळे थेट दंड वसूल होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
- - -
सर्वाधिक वाहन कारवाई
कारवाई * वाहनधारक * दंड
पोलिसांचा इशारा न पाळणे * १०,५४९*३४,९८,१००
मोबाईल टॉकिंग * ९१७५ * ४६,९८,६००
विदाऊट सीलबेल्ट * ६१३९*१२,२७,८००
मुदतबाह्य वाहनपरवाना * ४३७२* १४,२७,३००
- - - - -
वाहनावर दंड आहे काय हे तपासण्यासाठी मोबाईलवर महाराष्ट्र ट्रॅफिक अ‍ॅप डाऊनलोड करावे. या अ‍ॅपवर आपल्या सद्यस्थिती वाहनाची माहिती, मोबाईल नंबर अपडेट करावा. जेणेकरून वाहनासंबधी सर्वंकष माहिती त्वरित समजेल आणि दंड वेळेत भरता येईल.
-विकास अडसूळ, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84976 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..