केशवराव भोसले नाट्यगृह महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केशवराव भोसले नाट्यगृह महोत्सव
केशवराव भोसले नाट्यगृह महोत्सव

केशवराव भोसले नाट्यगृह महोत्सव

sakal_logo
By

फोटो- केशवराव भोसले
-

सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी आजपासून
संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त स्मृती महोत्सव

कोल्हापूर, ता. ७ ः सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन कार्यावर आधारीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सोमवार (ता. ८) ते बुधवार (ता. १०) पर्यंत विविध कार्यक्रम होतील. आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि केशवराव भोसले यांचे वंशज यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. ८) उद्घाटन सोहळा होईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालक विभिषण चवरे यांनी दिली.
कार्यक्रम व्यवस्थापनासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा कोल्हापूर यांचे सहकार्य घेतले आहे. या स्मृती महोत्सवातील सर्व कार्यक्रम प्रेक्षकांना विनामूल्य पाहता येणार आहेत. रसिकांनी या सर्व कार्यक्रमांचा भरभरुन आस्वाद घेण्याचे आवाहन चवरे यांनी केले आहे.

ठळक चौकट
असे होतील कार्यक्रम

सोमवार (ता. ८)
सायंकाळी ५ वाजता ः केशवराव भोसले यांच्या जीवनावरील छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन
सायंकाळी ६ वाजता ः ‘मी केशवराव’ नाटक (सादरकर्ते ः परिवर्तन कला फाऊंडेशन, दिग्दर्शन ः किरणसिंह चव्हाण)

मंगळवार (ता. ९)
सायंकाळी ४ वाजता ः आरंभी स्मरितो पाय तुझे हे संगीत नाटक (सादरकर्ते ः माझिरे दिग्दर्शित संक्रमण, पुणे )
सायंकाळी ७ वाजता ः लोककलावंतांच्या नजरेतील केशवराव ( सादरकर्ते ः लोकशाहिर प्रा. श्याम वानखेडे व शिवशाहीर डॉ. शिवराज शिंदे)

बुधवार (ता. १०)
सायंकाळी ४ वाजता ः नटश्रेष्ठ केशवराव भोसले यांच्या जीवनावरील नाट्यमय आठवणी त्यांच्या गाणशैलीवर आधारीत “संगीत सूर्यदर्शन”ः (सादरकर्ते ः प्रतिबालगंधर्व विक्रांत आजगांवकर, साथसंगत - श्रीरंग परब, अमर देऊलकर)
सायंकाळी ७ वाजता ः संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक भेट घडविणारे “संगीत संत तुकाराम” हे नाटक ः (सादरकर्ते ः मुंबईतील ओमनाट्यगंधा, लेखक बाबाजी राणे, दिग्दर्शन संतोष पवार)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84994 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..