सुरक्षा व्यवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुरक्षा व्यवस्था
सुरक्षा व्यवस्था

सुरक्षा व्यवस्था

sakal_logo
By

41557

मनपा कर्मचारी रस्‍त्यावर सुरक्षाविनाच
खोदाईची ठिकाणी रेडियमच्या पट्ट्या, बॅरिकेडस् नाहीत; रात्री अपघाताचा धोका

कोल्हापूर, ता. ७ ः महापालिकेतर्फे रस्त्यांवर अनेक प्रकारची दुरूस्तीची तसेच नियमित देखभालीची कामे केली जातात. शहरांतर्गत रस्त्यांवर वाहनांची तसेच पादचाऱ्यांची मोठी ये-जा असल्याने खोदाईच्या ठिकाणी वा अन्यवेळी सुरक्षेच्या उपाययोजना अभाव दिसून येत आहे. खोदाईचे ठिकाण रात्रीही समजून येण्यासाठी रेडियमच्या पट्ट्या असलेले बॅरिकेडस वा प्लास्टिकच्या पांढऱ्या पट्ट्या लावल्या जात नाहीत. त्यामुळे खोदाई समजून येत नसल्याने अपघाताची शक्यता आहे. तसेच रस्त्यावर काम करणारे कर्मचारी दूरवरून दिसावेत यासाठीच्या सुरक्षाविषयक सुविधा नाहीत.
पॅचवर्क, ड्रेनेज लाईन, पाईपलाईन, क्रॉसड्रेन दुरूस्तीची तसेच सफाईची कामे महापालिकेच्या कर्मचारी रस्त्यावरच करत असतात. अनेकदा त्यातील काही रस्ते वर्दळीचे असतात, तर काही वेळा उपनगरातील कमी वर्दळीचे असतात. कमी वर्दळीच्या रस्त्यावर वाहनधारक सुसाट असतात. अशावेळी त्यांच्यासमोर अचानक खोदाई दिसते, त्यावेळी अपघात होण्याची शक्यता असते. तसेच रात्रीही ते ठिकाण समजावे याची दक्षता घेतली जात नाही. त्या परिसराला रेडियमसारख्या प्लास्टिकच्या पट्ट्या गुंडाळल्या जात नाहीत की बॅरिकेडस लावले जात नाहीत. एखादा दुचाकीस्वार त्यातील दगडाला धडकून जीव गमावू नये म्हणून अनेकदा स्थानिक नागरिकच तिथे झाडाची फांदी लावणे, कापड लावलेली काठी लाव असे उपाय करतात.
फुटपाथ, गटारींची स्वच्छता तसेच रस्ते सफाईसाठी कर्मचारी रस्त्यावर असतात. ते सफाई कर्मचारी आहेत हे समजण्यासाठी उठावदार रंगाचे जॅकेट वा शर्ट आवश्‍यक असतात. अनेक कर्मचारी गणवेशविनाच असतात, हाही मोठा प्रश्‍न आहे. अतिक्रमण हटाव, ड्रेनेजलाईनच्या मॅनहोलची स्वच्छता करण्यासाठी जेसीबी, जेट मशीन वापरले जाते. त्यावेळी वाहनधारक तिथपर्यंत आल्यानंतर काम सुरू असल्याचे समजते. अशावेळी संबंधित रस्ता पाठीमागून बंद करण्याची व्यवस्था केली जात नाही. अनेकवेळा काम झाल्यानंतर खड्डा मुजवल्यानंतरही गंभीर परिस्थिती असते. अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणाची गंभीरता लक्षात येऊन सारवासारव केली जाते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85013 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..