पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाऊस
पाऊस

पाऊस

sakal_logo
By

जिल्ह्यात दिलासादायक संततधार
---
राधानगरीतून १६०० क्युसेक विसर्ग; सहा बंधारे पाण्याखाली
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा शेती आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पंधरा ते वीस दिवसांपासून उघडीप दिलेला पाऊस जिल्ह्यात पुन्हा सक्रिय झाला. रात्री उशिरा कसबा बावडा येथील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. आज सायंकाळी सहापर्यंत जिल्ह्यातील सहा बंधारे पाण्याखाली गेले. राधानगरी धरणातून १६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील इचलकरंजी, शिंगणापूर, राजाराम, सुर्वे व रुई असे एकूण पाच बंधारे आणि दूधगंगा नदीवरील दत्तवाड बंधारा पाण्याखाली गेला आहे. गगनबावडा तालुक्‍यात ९७.४ मिलिमीटर पाऊस झाला. दरम्यान, सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असल्याने ओढे आणि नाले वाहत आहेत. दोन तासांच्या पावसानंतर तासभर उघडीप मिळत असल्याने शेतातही पाणी साचून राहत नाही. पाण्याचा योग्य निचरा होत आहे. जिल्ह्यातील माळरानातील भात, भुईमूग आणि सोयाबीन पिकांना मोठ्या पावसाची गरज होती. उन्हामुळे भातासह इतर कडधान्यांच्या रोपांची पाने पिवळी पडली आहेत. तसेच, पाने पिवळी पडली तर युरिया किंवा इतर खतांचा डोस दिला जातो. पाऊस नसल्याने खतांचा डोसही देता येत नव्हता. पाऊस पुन्हा सुरू झाल्याने पिकांना उभारी मिळाली आहे. पिकांना खतांचा डोस देण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल सुरू झाली. रात्री उशिरानंतर पावसाचे प्रमाण थोडे कमी राहिले. तसेच, वातावरणातही थंडी जाणवू लागली आहे.

गगनबावडा तालुक्यात ९७.४ मिमी पाऊस
जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात ९७.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हातकणंगले- १०.५ मिमी, शिरोळ- ६.६ मिमी, पन्हाळा- १९.७ मिमी, शाहूवाडी- ४२.२ मिमी, राधानगरी- ५१.७ मिमी, गगनबावडा- ९७.४ मिमी, करवीर- १९.३ मिमी, कागल- २६.२ मिमी, गडहिंग्लज- ३०.१ मिमी, भुदरगड- ६१.९ मिमी, आजरा- ४६.३ मिमी, चंदगड- ४८.५ मिमी, अशी एकूण ३१.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

धरण* पाणीसाठा (दलघमीमध्ये)
राधानगरी* १८८.८४
तुळशी* ७९.३३
वारणा* ७९२.८३
दूधगंगा* ५२६.४०
कासारी* ६०.८०
कडवी* ६०.६७
कुंभी* ५९.८५
पाटगाव* ८७.०१
चिकोत्रा* ३६.४३
चित्री* ५०.३९
घटप्रभा* ४०.९५
आंबेओहोळ* ३०.९८
जंगमहट्टी व जांबरे मध्यम प्रकल्प आणि कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

बंधाऱ्यांची पाणी पातळी :
राजाराम १७.७ फूट, सुर्वे १९.२, रुई ४६.३, इचलकरंजी ४३.६, तेरवाड ३९.९ , शिरोळ २८, नृसिंहवाडी २८.४ , राजापूर १५.६, तर नजीकच्या सांगली ८.३ व अंकली १० फूट पाणी पातळी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85046 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..