वीज विधेयक विरोधात आंदोलन वीज विधेयक विरोधात आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज विधेयक विरोधात  आंदोलन 
 वीज विधेयक विरोधात  आंदोलन
वीज विधेयक विरोधात आंदोलन वीज विधेयक विरोधात आंदोलन

वीज विधेयक विरोधात आंदोलन वीज विधेयक विरोधात आंदोलन

sakal_logo
By

वीज कर्मचाऱ्यांचे
आज काम बंद
----------------
वीज विधेयकाला विरोध; कार्यालयांसमोर करणार निदर्शने

कोल्हापूर, ता. ८ : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार वीज (दुरुस्ती) विधेयक २०२२  सोमवार ( ता. ८) पटलावर आणणार आहे.  
विद्युत कायदा २००३ मध्ये सुधारणा करण्यासाठी हे  विधेयक आणले जात आहे. याचे ग्राहक आणि  कर्मचारी आणि अभियंते यांच्यावर दूरगामी परिणाम होणार आहेत. हे विधेयक जे संसदेत संमत झाले तर त्याच क्षणी देशातील वीज मंडळातील कर्मचारी १२ तासांचे काम बंद आंदोलन करणार आहेत. यात राज्य वीज मंडळातील ४० हजार कर्मचारी आणि २० हजार कंत्राटी कर्मचारीही कार्यालयासमोर निदर्शने करतील, असे पत्रक संयुक्त कृती समितीतर्फे प्रसिद्धीस दिले आहे.  
गत वर्षी केंद्र सरकारने संयुक्त किसान मोर्चाला  शेतकऱ्यांसह सर्व संबंधितांशी सल्लामसलत केल्याशिवाय वीज (दुरुस्ती) विधेयक संसदेत सादर केले जाणार नाही, असे लेखी आश्वासन दिले होते;  पण संघटनेला विश्वासात न घेता विधेयक संसदेत मांडून पास करण्याचा एकतर्फी निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जर हे विधेयक मंजूर केले गेले तर वीज कर्मचारी आणि अभियंते काम बंद करतील आणि कामाच्या ठिकाणी काळी फीत लावून दिवसभर निदर्शने करतील, असा निर्णय घेतल्याचे पत्रक संयुक्त समितीने प्रसिद्धीस दिले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85058 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..