तेजस पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तेजस पाटील
तेजस पाटील

तेजस पाटील

sakal_logo
By

फोटो
09998,
तेजस पाटील दिल्ली दबंगमध्ये
प्रो कबड्डी लीगमध्ये सात लाख रुपयांची बोली
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : टॅलेंट असेल, तर कबड्डीत किती आर्थिक रक्कम मिळू शकते, याचा दाखला वीसवर्षीय तेजस मारुती पाटील याने दिला आहे. त्याची प्रो कबड्डी लीगकरिता दिल्ली दबंग कबड्डी संघात निवड झाली असून, नवोदित खेळाडू म्हणून त्याला सात लाख रुपये बोली मिळाली आहे. तो कबड्डी रावज अॅकॅडमीचा खेळाडू आहे.
तेजस मूळचा सडोली खालसा येथील असून, तेथील रा. बा. पाटील हायस्कूलमधून त्याने दहावीपर्यंत शिक्षण घेतले. इयत्ता सातवीत असतानाच तो आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक डॉ. रमेश भेंडिगिरी यांच्याकडे प्रशिक्षणासाठी दाखल झाला. याच दरम्यान तो शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत खेळला. हातकणंगले येथील डांगे महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण घेत असताना त्याने कबड्डीतील डावपेचांचा जोरदार सराव केला. डॉ. भेंडीगिरी यांच्यासह कोल्हापूर जिल्हा कबड्डी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्याला वेळोवेळी प्रोत्साहन मिळाले. कोल्हापूर जिल्हा कबड्डी संघाकडून तो विविध स्पर्धाही खेळला. वीस वर्षांखालील महाराष्ट्र कबड्डी संघाचा तो दोन वेळा कर्णधार होता. त्यावेळी महाराष्ट्र संघाने रौप्य व कास्य पदक पटकावले होते.
सध्या तो सदरबाजार येथील राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयात एसवायबीएमध्ये शिकत आहे. कबड्डीतील कौशल्याच्या जोरावर त्याला यंदा नवोदित खेळाडू म्हणून दिल्ली दबंग संघात स्थान मिळाले आहे. प्रो कबड्डीमध्ये स्थान मिळणारा तो कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव खेळाडू आहे.
.........
चौकट
वडील राष्ट्रीय खेळाडू
तेजसचे वडील मारुती पाटील राष्ट्रीय कबड्डीपटू असून, ते पोलिस सेवेत कार्यरत आहेत. सध्या त्यांची नेमणूक इचलकरंजी येथे वाहतूक पोलिस म्हणून आहे. डॉ. भेंडिगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कबड्डीचे धडे गिरवले होते.

कोट-
तेजसची निवड त्याच्या कौशल्याला वाव देणारी आहे. तो कबड्डीत जीव ओतून सराव करतो. दिल्ली दबंगसारख्या संघातून खेळताना त्याला मोठा अनुभव मिळेल. त्याला केवळ एका संधीचे आवश्यकता होती. ती मिळाली आहे. त्याचे तो सोने करेल.
- डॉ. रमेश भेंडिगिरी (आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85096 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..