पंजे भेटीचा सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंजे भेटीचा सोहळा
पंजे भेटीचा सोहळा

पंजे भेटीचा सोहळा

sakal_logo
By

41600

मोहरमच्या उत्साहाला उधाण
---
पंजे भेटी सोहला; आज रंगणार खत्तलरात्र खाई फोडण्याचाही विधी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले मोहरमचे पर्व आता सांगतेकडे निघाले आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी शहरात भर पावसात मिरवणुकांसह पंजे भेटीचे सोहळे पार पडले. आकर्षक विद्युत रोषणाईसह डॉल्बी आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात रात्री उशिरापर्यंत मिरवणुका निघाल्या. दोन वर्षांनंतर कोणत्याही निर्बंधाशिवाय मोहरमचा सण साजरा होत आहे. मानाच्या पंजे भेटींच्या सोहळ्याने मोहरमच्या उत्साहाला खऱ्या अर्थाने उधाण आले.
आज दुपारपासूनच सर्वत्र पंजे भेटीच्या सोहळ्याच्या तयारीला प्रारंभ झाला. सायंकाळी सहानंतर विविध ठिकाणांहून काही पारंपरिक लवाजम्यासह तर काही पंजे मिरवणुका डॉल्बीच्या दणक्यात नाचणाऱ्या तरुणाईसोबत भेटीसाठी बाहेर पडले. राजारामपुरी तिसरी गल्ली येथील सनदी बंधूंचा हजरत पीर झिमझिमसाहेब पंजा तब्बल सात वर्षांनी बाबूजमाल भेटीस बाहेर पडला होता. सोमवार पेठेतील तबकलशा पंजा, सदरबाजारमधील चांदसाबवली पंजाच्या मिरवणूक शेकडो कार्यकर्त्यांसह डॉल्बी आणि आकर्षक विद्युत रोषणाईसह निघाल्या होत्या. राजारामपुरीत बनसोडे बंधू मलिक रेहान पंजा खाटीक चौकातील लाड बंधूंचा ख्वाजा नवाज लक्षतीर्थमधील मुल्ला बंधूंचा मलिक रेहान मिरसाब पंजा रंकाळवेसमधील संदीप पाटील बंधूंचा चाँदसाहेब पंजा आदींच्या मिरवणूक सायंकाळनंतर आल्याने शिवाजी महाराज चौक तर गर्दीने फुलून गेला होता. रात्री दहाच्या सुमारास बाबूजमाल दर्ग्यातील पाचही पंजे भेटीसाठी बाहेर पडले. याच दरम्यान बहुतांश पंजे शिवाजी रोड, शिवाजी चौक, भवानी मंडप, बाबूजमाल दर्गा या परिसरात आल्याने येथे अनेक पंजा मिरवणुकीच्या रोषणाईमुळे झगमगाट झाला होता. 
अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या, तरीही मात्र त्याची तमा न बाळगता पंजे भेटीच्या मिरवणुका निघाल्या. आज काही ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन झाले. दरम्यान, सोमवारी (ता. ८) बाबूजमाल दर्ग्यासह शहरातील विविध ठिकाणी खत्तल रात्रीनिमित्त खाई फोडण्याचा पारंपरिक विधी होणार आहे. मंगळवार पेठेतील सणगर, बोडके तालीम मंडळातर्फेही यंदा खत्तलरात्रीचा सोहळा  होणार आहे. नैवेद्य व फेटे अर्पण करण्यासाठी उद्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर बाबूजमाल दर्गा, घुडणपीर दर्ग्यासह मानाच्या पंजांच्या ठिकाणी खबरदारी घेतली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85102 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..