साडेतीन कोटींच्या विकासकामांची मागणी; आमदार राजेश पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडेतीन कोटींच्या विकासकामांची मागणी; आमदार राजेश पाटील
साडेतीन कोटींच्या विकासकामांची मागणी; आमदार राजेश पाटील

साडेतीन कोटींच्या विकासकामांची मागणी; आमदार राजेश पाटील

sakal_logo
By

41684
राजेश पाटील

विविध विकासकामांसाठी
साडेतीन कोटींची मागणी
आमदार राजेश पाटील; ‘जिल्हा नियोजन’कडे प्रस्ताव
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील विविध गावांत तीन कोटी ४४ लाख रुपयांच्या विकासकामांची मागणी केली आहे. आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत एक कोटी ६२ लाख, तर डोंगरी विकास योजनेंतर्गत एक कोटी ८२ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे. या कामांच्या प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती आमदार राजेश पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकातून दिली आहे.
आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमातून हेब्बाळ कसबा नूल, महागाव (प्रत्येकी ७ लाख), हिटणी (६ लाख), निलजी (१४ लाख), महागाव (७ लाख) कवळीकट्टी, बुगडीकट्टी, बसर्गे, हिडदुगी, येणेचवंडी, मनवाड, कडलगे, नौकुड, शिंदेवाडी, चिंचेवाडी, हरळी बुद्रुक, जरळी, शिप्पूर तर्फ नेसरी (प्रत्येकी पाच लाख), मुगळी (८ लाख), हुनगिनहाळ (३ लाख), मांगनूर तर्फ सावंतवाडी (८ लाख) या गावातील रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, तनवडी (१० लाख) सभामंडप उभारणे, श्रृंगारवाडी व हंदेवाडी (प्रत्येकी ५ लाख) येथे आरसीसी गटर्स व पेव्हिंग ब्लॉक बसविणे या कामांचे प्रस्ताव सादर केले आहेत, तर स्थानिक विकास कार्यक्रमातून (अनुसूचित जाती-जमाती) हेब्बाळ कसबा नूल, नेसरी, सांबरे, नांगनूर (प्रत्येकी ५ लाख), हसुरचंपू (७ लाख) येथील रस्त्याची, तर बसर्गे (५ लाख) येथे मोऱ्या दुरुस्तीचे काम सुचविले आहे.
डोंगरी विकास कार्यक्रमातून शेंद्री (९ लाख), बुगडीकट्टी, नेसरी (प्रत्येकी १५ लाख), नरेवाडी, भडगाव, वाघराळी, वाटंगी, हत्तीवडे, बोलकेवाडी (प्रत्येकी १० लाख), बिद्रेवाडी (७ लाख), औरनाळ (६ लाख), हडलगे, तारेवाडी, बटकणंगले, सिरसंगी, हुडे, सरंबळवाडी, हारुर (प्रत्येकी ५ लाख) या गावातील रस्त्यांची कामे, भडगाव (१० लाख), मुत्नाळ, नूल (प्रत्येकी ५ लाख) सामाजिक सभागृह बांधणे, श्रृंगारवाडी (५ लाख) आरसीसी गटर्स बांधणे आदी कामांचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. गडहिंग्लज तालुक्यातील दोन कोटी ८४ लाखांची, तर आजरा तालुक्यातील ६० लाखांची कामे आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85176 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..