निकृष्ठ कामे पुन्हा करणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निकृष्ठ कामे पुन्हा करणे
निकृष्ठ कामे पुन्हा करणे

निकृष्ठ कामे पुन्हा करणे

sakal_logo
By

41788
-----------
निकृष्ट कामे पुन्हा करणे
तारदाळ ग्रामसभेत ठराव; ‘हर घर तिरंगा’ राबवण्याचे आवाहन
इचलकरंजी, ता. ९ : १५ ऑगस्टला होणारी गावसभा सोमवारी झाली. यावेळी पंधराव्या वित्त आयोगातून गावात झालेली निकृष्ट कामे पुन्हा करून घेण्याबाबतचा ठराव केला. शासनाच्या लोकनियुक्त सरपंच निवडीस गावातर्फे विरोधाचा ठराव केला. नर्मदेशेजारील ओढ्याची प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेणे, एकूण डिमांड व वसुली रकमेच्या तपशील दाखवणे, तसेच क्रीडांगणासाठी नवीन ठराव करून तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणे आदी ठराव केले. अध्यक्षस्थानी सरपंच यशवंत वाणी होते.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्याचे आवाहन ग्रामसेवक बी. डी. कापसे यांनी केले. विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन करून ठराव केले. यामध्ये घरफाळा व पाणीपट्टी थकबाकीदाराचे कनेक्शन कट करणे, जावईवाडी वेताळेश्वर मंदिर परिसरातील पाण्याचा प्रश्न सोडवणे आदी ठराव केले. उपसरपंच मृत्युंजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य यासीन मुजावर, चंद्रकांत तांबवे, वैशाली निकम, रणजित पोवार आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85267 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..