आयटीआयची दुसरी यादी जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयटीआयची 
दुसरी यादी जाहीर
आयटीआयची दुसरी यादी जाहीर

आयटीआयची दुसरी यादी जाहीर

sakal_logo
By

आयटीआयची
दुसरी यादी जाहीर
प्रवेशासाठी शुक्रवारअखेर मुदत; मंगळवारी तिसरी यादी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज ता. ९ : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात ( आयटीआय) प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्याची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यात राज्यातील ९० टक्के शासकीय संस्थात प्रवेश फुल्ल झाले आहेत. या प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवार (ता.१२) अखेर आपला प्रवेश निश्चित करावयाचा आहे. या फेरीसाठी पहिले तीन विकल्प सक्तीचे आहेत. तिसऱ्या यादीसाठी विद्यार्थ्यांना याच कालावधीत पसंतीक्रम भरण्याची मुदत आहे. मंगळवारी (ता.१६) तिसरी यादी जाहीर होईल. प्रवेशाच्या एकूण चार फेऱ्या होणार आहेत.
आयटीआयची प्रवेशप्रकिया सुरू आहे. यातील प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची पहिली यादी २९ जुलैला जाहीर झाली होती. यात पहिला पसंतीक्रम असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशसक्तीचा होता. यात शासकीयमध्ये ७५ हजार ७९९ तर खासगी संस्थांत १६ हजार ३४१ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला आहे. दुसऱ्या यादीत याप्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आपली मूळ गुणपत्रके, दाखले आणि शुल्क घेऊन संबंधित संस्थेत शुक्रवारपर्यंत प्रवेश निश्चित करावयाचा आहे.
विद्यार्थ्यांना तिसऱ्या यादीसाठी पसंतीक्रम भरण्याची शुक्रवारअखेर संधी आहे. त्याची मंगळवारी सायंकाळी यादी लागेल. त्यात पहिले पाच पसंतीक्रम सक्तीचे असून, त्या विद्यार्थ्यांनी २० ऑगष्टअखेर प्रवेश घ्यावयाचा आहे. या यादीतील विद्यार्थ्यांनी २० ऑगष्टपर्यंत प्रवेश घेण्याची मुदत आहे. चौथ्या फेरीसाठी वीस ऑगष्टअखेर पसंतीक्रम भरण्याची संधी आहे. त्याची २३ ऑगष्टला यादी लागेल. त्यानंतर संस्थास्तरावरील शेवटची फेरी होणार आहे.

चौकट...
इलेक्ट्रिशियनला पंसती
यंदा दोन फेऱ्यांत सर्वाधिक सुमारे ६३ टक्के विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिशियन कोर्सला पसंती दिली आहे. पाठोपाठ मेकॅनिकल मोटर व्हेइकल (५२ टक्के), डिझेल मेकॅनिक (४७), फिटर (४५ ), कॉप्युटर (४२), इलेक्ट्रॉनिक्स (४१) वेल्डर (३३ टक्के) असा कल प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85510 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..