गावातील कचर्‍याचा प्रश्‍‍न झाला गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावातील कचर्‍याचा प्रश्‍‍न झाला गंभीर
गावातील कचर्‍याचा प्रश्‍‍न झाला गंभीर

गावातील कचर्‍याचा प्रश्‍‍न झाला गंभीर

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून
फोटो कचरा

गावागावांना कचऱ्या‍चा विळखा
निर्गतीचा प्रश्न गंभीर; शास्‍त्रशुद्ध सर्वेक्षणाची गरज; धडक कृती कार्यक्रमाची गरज
सदानंद पाटील ः सकाळ वृत्तसेवा
्‍कोल्‍हापूर, ता. ९ : जिल्‍ह्याच्या ग्रामीण भागात रस्‍ते, गटर्स, पाणी योजना, इमारतींसाठी दरवर्षी हजारो कोटी खर्च केले जात आहेत; मात्र दुसऱ्या बाजूला सर्वच गावांना समान प्रश्‍‍न भेडसावत आहे, तो कचऱ्याचा. गावातील कचरा हा अनेक संकटांचा स्‍त्रोत बनत आहे. कधी हा कचरा जनावरांच्या पोटात जातो, तर कधी कचऱ्यामुळे गटर्स तुंबून घराघरांत सांडपाणी शिरते. हा कचरा पसरल्याने येणारी रोगराई बऱ्याचवेळा माणसाच्या जिवावरही बेतते. जिल्‍ह्यातील ११९२ ग्रामपंचायती व गावांमधील कचऱ्या‍ची समस्या सोडवण्यासाठी धडक कृती कार्यक्रम राबवण्याची गरज आहे.

जिल्‍ह्याच्या ग्रामीण भागाची लोकसंख्या २७ ते २८ लाखांवर पोहोचली आहे. शहरांजवळील गावांचा उपनगरांत समावेश होत आहे. गावातील सुविधाही वाढू लागल्या आहेत, मात्र वाढत चालले शहरीकरण आणि गावांचा होत असलेला कायापालट, यातून अनेक समस्या निर्माण होत आहेत. सध्या दुर्लक्षित असलेली समस्या आहे, ती घनकचऱ्या‍ची. यात प्‍लास्‍टिक, कापड, रेक्‍झीन, थर्माकोल, राख, पालापाचोळ्यापासून ते खतांच्या, सिमेंटच्या पिशव्या, शिळे अन्‍न, भाजीपाल्यापर्यंत किमान
२८ ते ३० प्रकारचा ओला व सुका कचरा निर्माण होत आहे, मात्र त्याची शास्‍त्रशुध्‍द विल्‍हेवाट लावण्याची व्यवस्‍था नाही.
जिल्‍हा परिषदेने या गावातील कचऱ्याची वास्‍तवदर्शी माहिती संकलित करणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे गावनिहाय उपाययोजना ठरवणे शक्य आहे. प्रकल्‍पासाठी आवश्यक जागेचा प्रश्‍‍न सोडवणे व या सर्वासाठी निधी देणे आवश्यक आहे.

....
घनकचरा व्यवस्‍थापनाची सद्यस्‍थिती

*तालुका गावांची संख्या डीपीआर तयार अंदाजपत्रक तयार
*आजरा* *९४ *९३ * ५
*भुदरगड * *१०४ *१०२ *०
*चंदगड * *१५७ *१५२ *१
*गगनबावडा* *३९ *३९ *४
*गडहिंग्‍लज * *९० *७८ *१
*हातकणंगले * * ६१ *२४ *५
*कागल * *८५ *७३ *२
*करवीर *१३० *९० *२९
*पन्‍हाळा *१२९ *११६ *२३
*राधानगरी *११६ *१०४ *३
*शाहूवाडी *१३३ *१३१ *२५
*शिरोळ *५४ *२२ *५
---------------------------------------------------------------
*एकूण *११९२ *१०२४ *९९
....
प्रकल्‍पासाठी २३ दाखले
घनकचरा प्रकल्‍प उभारण्यासाठी गायरानाचा वापर होऊ शकतो, मात्र बहुतांश ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे शिल्‍लक व अतिक्रमणमुक्‍त गायरान किती, याचा शोध घ्यावा लागेल. तसेच गायरानात प्रकल्‍प राबवायचा झाल्यास २३ प्रकारचे दाखले गोळा करावे लागतात. ही यादी पाहूनच अनेक गावांनी कचरा प्रकल्‍पांना रामाराम ठोकला आहे. त्यामुळे प्रशासनाला याबाबत कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.
….

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85515 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..