गडहिंग्लजला क्रांती दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजला क्रांती दिन
गडहिंग्लजला क्रांती दिन

गडहिंग्लजला क्रांती दिन

sakal_logo
By

42002
गडहिंग्लज : पंचायत समितीच्या आवारातील क्रांतीस्तंभाला अभिवादनप्रसंगी शरद मगर, अनंत पाटील, आनंद गजगेश्वर, आर. के. वांद्रे, सुभाष चोथे आदी.
42003
गडहिंग्लज : क्रांती दिनानिमित्त शिवराज महाविद्यालयातर्फे काढण्यात आलेली क्रांतिज्योत व तिरंगा दौड.

क्रांतिकारकांच्या कार्याला उजाळा
---
गडहिंग्लजला क्रांती दिन; शाळा-महाविद्यालयात क्रांतिज्योत, तिरंगा दौड
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ : शहरासह परिसरात क्रांतिदिन झाला. शिवराज महाविद्यालयातर्फे क्रांतिज्योत व तिरंगा दौड काढण्यात आली. शाळा- महाविद्यालयांत झालेल्या कार्यक्रमात वक्तृत्व स्पर्धा, भित्तिपत्रकाचे अनावरण या माध्यमातून क्रांतिकारकांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाइकांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान, येथील पंचायत समितीच्या आवारातील क्रांतिस्तंभाचे पूजन करण्यात आले. गटविकास अधिकारी शरद मगर व अनंत पाटील यांच्या हस्ते पूजन झाले. स्वातंत्र्य चळवळीत बलिदान दिलेल्या क्रांतिवीरांना अभिवादन करण्यात आले. अमोल देसाई यांनी प्रास्ताविक केले. मगर यांनी मार्गदर्शन केले. सहायक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्‍वर, पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर गुरबे, आर. के. वांद्रे, सुभाष चोथे, युवराज बरगे, अॅड. संदीप फगरे, विनायक पाटील, प्रकाश पाटील, बाळासाहेब गुरव, प्रा. अनिल मगर यांच्यासह साधना हायस्कूल, घाळी महाविद्यालय, शिवराज महाविद्यालयाचे ‘एनसीसी’चे कॅडेट उपस्थित होते.

‘शिवराज’तर्फे तिरंगा दौड
शिवराज महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा व राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे क्रांतिदिनानिमित्त क्रांतिज्योत व तिरंगा दौड काढण्यात आली. संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे, उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, संचालक बसवराज आजरी, डॉ. राहुल मगदूम, प्रा. जयवंत पाटील यांच्यासह ‘एनसीसी’चे कॅडेट, खेळाडू सहभागी झाले. ‘भारत माता की...’, ‘वंदे मातरम’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) येथील हुतात्मा बिंदू नारायण कुलकर्णी स्मारकापासून तिरंगा दौड सुरू झाली. सरपंच पूजा कोरे, उपसरपंच आशिष पाटील आदींनी स्वागत केले. हेब्बाळ, दुंडगे येथेही क्रांतिज्योतीचे स्वागत करण्यात आले. बाजार समिती कमानीजवळ संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी क्रांतिज्योतीचे पूजन केले. तिरंगा दौड पंचायत समितीतील क्रांती स्तंभाजवळ आली. या ठिकाणी गटविकास अधिकारी शरद मगर यांनी स्वागत केले. शिवराज महाविद्यालयात तिरंगा दौडची सांगता झाली. प्रा. बीना कुराडे, डॉ. सुधीर मुंज, प्रा. तानाजी चौगुले यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

घाळी महाविद्यालय
डॉ. घाळी महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि ग्रंथालय विभागातर्फे कार्यक्रम झाला. उपप्राचार्य ए. बी. उंदरे यांच्या हस्ते क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन झाले. सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. महेश कदम यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी क्रांती दिनाचे महत्त्व आणि गडहिंग्लज तालुक्याचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान याची माहिती दिली. स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबातच जन्माला आलेल्या प्रा. उंदरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यापाठीमागचा उद्देशही त्यांनी सांगितला. या वेळी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक आणि कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. प्रा. डॉ. आर. एस. सावंत यांनी आभार मानले.

जागृती हायस्कूल...
जागृती हायस्कूल व रावसाहेबअण्णा कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य विजय चौगुले, व्ही. एस. शिंदे यांच्या हस्ते भित्तिपत्रकाचे अनावरण झाले. सलोनी पाटील, जान्हवी शिंदे, अनुष्का संभाजी, प्रियांका रावण, श्रेयस उपासे या विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांच्या जीवनकार्याची माहिती दिली. बी. व्ही. खरात यांनी देशभक्तिपर गीत सादर केले. प्रा. सुनील देसाई, विद्या पन्हाळे, आर. बी. लोखंडे, एस. बी. अनावरे आदी उपस्थित होते. आय. एस. भरडी यांनी सूत्रसंचालन केले. ए. बी. पाटील यांनी आभार मानले.

न्यू इंग्लिश स्कूल
कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये क्रांतिदिन व संस्थापक ईश्‍वराप्पा नडगदल्ली यांचा स्मृतिदिन असा संयुक्त कार्यक्रम झाला. मुख्याध्यापिका एस. एस. इनामदार यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. सुनील माने यांनी प्रास्ताविक केले. अमृत देसाई व इनामदार यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, दोन गटांत वक्तृत्व स्पर्धा झाली. लहान गटात सृष्टी वांगणेकर, श्रेयस लोखंडे, युगंधरा येसरे यांनी, तर मोठ्या गटात प्रेरणा भुजंग, शंभुराजे देसाई, जयदीप गाडीवड्ड यांनी पहिले तीन क्रमांक मिळविले. सुनील माने, स्वाती पाटील, दीपक सावंत, नामदेव यादव यांनी परीक्षण केले. प्रेरणा भुजंग व आयुष बागडी यांना विशेष बक्षीस देण्यात आले. अमृत देसाई यांनी एक हजार रुपयांची बक्षिसे दिली. विश्‍वजित चव्हाण, बळिराम पाटील, सुरेखा नंदनवाडे, बाळासाहेब मोहिते, दुंडाप्पा कांबळे, गजानन काटकर आदी उपस्थित होते.

ओंकार महाविद्यालय
ओंकार महाविद्यालयात क्रांतिदिनानिमित्त कार्यक्रम झाला. प्रा. स्वयंप्रभा सरमगदूम अध्यक्षस्थानी होत्या. डॉ. काशीनाथ तनंगे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अनिल पाटील यांचे ‘स्वातंत्र्याची ७५ वर्षे : काय कमावले, काय गमावले’ या विषयावर व्याख्यान झाले. देशातील लोकांनी लोकशाही मूल्ये स्वीकारली आणि चांगल्या लोकांना निवडून दिले, तर सामान्य माणूस सुखी होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. धर्मवीर क्षीरसागर यांनी आभार मानले.

गडहिंग्लज हायस्कूल
येथील गडहिंग्लज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांती दिनानिमित्त कार्यक्रम झाला. स्वातंत्र्यसैनिक मारुती काळे यांच्या पत्नी अक्काताई काळे यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य पी. टी. पाटील, एस. डी. कांबळे, माजी सैनिक कुमार पाटील, सी. एस. कुंभार, टी. डी. पाटील, आप्पासाहेब शिंदे, के. के. सूर्यवंशी, आर. डी. जगदाळे, एनसीसी कॅडेट संस्कृती आडावकर, लक्ष्मी बहुरूपी, प्रगती टोमणे, आप्पाजी काळे, माजी सैनिक पांडुरंग देसाई आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85533 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..